वर्ध्यात चार ग्रामपंचायतीत काँग्रेस तर चार ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता
साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे वर्धा:
वर्धा जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर झाले आहे. नऊपैकी चार ग्रामपंचायतीत काँग्रेस तर भाजपला चार ग्रामपंचायतीत सत्ता काबीज करता आली यावरच दोन्ही पक्षाला समाधान मानावे लागले.वर्धा तालुक्यातील सालोड आणि बोरगाव (नां.) येथे भाजपची सत्ता आली. आर्वी तालुक्यात सात पैकी चार ग्रामपंचायतींवर काँग्रेसची सत्ता आली. दोन ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता असणार आहे. आर्वी तालुक्यात भाजपचे आमदार दादाराव केचे, काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
आर्वी तालुक्यात भाजपने दोन ग्रामपंचायतीत तर काँग्रेसनं चार ग्रामपंचायतीत सत्ता मिळवली. आर्वी तालुक्यात निकाल मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने दिला आहे.मागच्या वेळी काँग्रेसकडे दोन ग्राम पंचायत होत्या तर यावेळी दोन ग्राम पंचायत वर्चस्व मिळवता आले. निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी विजयी जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली. कार्यकर्त्यांनी वाजतगाजत विजय साजरा केला.फुलाचा वर्षाव करण्यात आला. आर्वीत कॉंग्रेस विजय मिळाला असता आंनद गगनात मावेनासा झाला होता.तर भाजप मध्ये चेहऱ्यावर निरागसता पाहायला मिळाली.