वर्ध्यात पावसाचा कहर : कान्होली, आलमडोह गावाला पाण्याने वेढले ,निम्न वर्धा धरणाचे ३१ दरवाजे उघडले तर २१ घरात पाणी ; १० गावाचा संपर्क तुटला तर काही ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला
Byसाहसिक न्युज 24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
हिंगणघाट तालुका
कान्होली आलमडोह गावाला पाण्याने वेढले आहे लोकांना उंचाहवर थांबण्यास सांगीतले आहे.
सेलू तालुका
सिंदी ते दिग्रज येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने दिग्रज गावाचा वाहतूक संपर्क तुटलेला आहे. तसेच सिंदी ते पळसगाव बाई येथील वाहतूक संपर्क बंद झाला. तसेच दहेगाव ते पहेलानपुर वाहतूक संपर्क बंद झाला आहे.
बोरखेडी कला लगत असलेल्या नाल्याला पूर आला असुन रोड वरून अंदाजे 3 ते 4 फूट पाणी आहे. ये जा बंद करण्यात आली आहे.
पिंपळगाव येथे बोर नदीला पूर गावापर्यंत पाणी शिरले. तुर्त कोणताही धोका नाही. परंतु सर्वत्र पाउस होत असल्याने नदी व नाले तुडूंब भरुन वाहत आहे.
चिंचोली लगत असलेल्या नाल्याला पूर आला असुन पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतूक संपर्क बंद झाला आहे.
चाणकी-कोपरा गावादरम्यान असलेल्या पुलावरून पाणी जात असल्याने वाहतुक बंद करण्यात आली आहे
हमदापुर येथे राष्ट्रीय महामार्ग चे कामामुळे काही घरांमधे पाणी घुसले आहे
बाभूळगाव पुलावरून पाणी सुरू असल्याने रहदारी बंद झाली आहे. काही घरे पाण्याखाली गेली आहेत.
आर्वी तालुका
वर्धमनेरी येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद झालेली आहे. दोन्ही साईडला पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
आर्वी शिरपूर रोड खडकीजवळ बंद झाला आहे.
हिंगणघाट तालुका :
कान्होली गावात पाणी शिरले आहे.
कुटकी मार्ग बंद झाला आहे.
दाभा मार्ग बंद झाला आहे.
पिंपळगाव रोड बंद झाला आहे.
सोनेगाव कान्होली आलमडोह या गावात पाणी शिरले आहे.
महाकाली नगर मध्ये ५०-६० लोक अडकले आहेत. नाल्यामध्ये पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे पोहोचता येत नाही. पाणी वाढत आहे.