वर्ध्यात मतिमंद मुलीवर अत्याचार
साहसिक न्यूज24
प्रतिनिधी/ वर्धा:
आष्टी तालुक्यातील पोरगव्हान येथे वीस वर्षीय मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे. मुलीच्या घरी कुणी नसताना हा प्रकार घडला आहे.
प्राप्त माहिती नुसार पोरगव्हान येथे दुपारीआई वडील शेतात मजुरीसाठी गेले असताना घरी कुणी नव्हते. याचाच फायदा घेत आरोपी अतुल सुरेश बोरीवार( 25) याने मतिमंद मुलीवर अत्याचार केला. मुलीचा भाऊ घरी पोहचला असताना त्याने खिडकीतून घराबाहेर पळ काढला. भावाच्या तक्रारीवरून आष्टी पोलिसां 376 चा गुन्हा नोंद केला आहे. गावातूनच आरोपीला अटक करण्यात आली आहे.