वर्ध्यात मनुस्मृती दहन दिन साजरा

0

प्रतिनिधी/ वर्धा:

25 डिसेंबर 1927 रोजी प्रतीकात्मक पद्धतीने केलेल्या मनुस्मृती दहनाची आठवण आजही प्रकर्षाने जागी होते. महाडच्या चवदार तळ्याचा खुला वापर आणि काळाराम मंदिर प्रवेशाचा संदर्भ यामागे होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली केलेल्या त्या कृतीतून एकाच वेळी जातिभेद आणि स्त्रीदास्य या दोहोंच्या अंतासाठी संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त झाला होता. मनुस्मृती दहनाची कृती हिंदू धर्मातील भेदभाव आणि शोषणाला समर्थन देणार्‍या विचारसरणीच्या विरोधात होती. त्यातूनच समता, न्याय आणि परस्पर आदर यावर आधारित समाज तयार होईल याची बाबासाहेबांना खात्री होती. आज वर्ध्यातील बोरगाव मेघे येथील गणेश नगर मध्ये भिम ज्योती बुद्ध विहार येथे भारतीय स्त्री मुक्ती दिनावर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती याच वेळी 94 वा मनुस्मृती दहन दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी कार्यक्रमाला लाभलेले मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाला लाभलेले कामगार नेते काँग्रेट राजू गोर्डे यांनी मनस्मृती दहन यावर आपले विचार मांडले तसेच सामाजिक कार्यकर्त्यां प्रियदर्शना भेले यांनी मनस्मृती ही एक स्त्रियांसाठी धोका आहे. स्त्रियांना घटनेमध्ये संपूर्ण स्वातंत्र्य दिले आहे परंतु मनस्मृतीने स्त्रियांना चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित ठेवले आहे. आम्ही आज शिक्षित आहोत कोणी राष्ट्रपती आहेत तर कोणी कलेक्टर आहेत तर कोणी न्यायाधीश आहेत हे सर्व घडले आहे बाबासाहेबांच्या संविधानामुळे यामुळे आम्ही आज मनस्मृतीचे दहन केले. यावेळी मंगला कांबळे यांनी स्त्री मुक्ती दिना नीमित्य आपले विचार मांडले कार्यक्रमाला मंदा फुसाटे, उषा कांबळे, सौं नगराळे, बुद्धपाल कांबळे सुषमा वसेकर यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन नम्रता भोंगाडे यांनी केले तर आभार सिद्धार्थ डोईफोडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पौर्णिमा ताकसांडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित एक गाणे सादर केले. यावेळी परिसरातील उपासक व उपासिका, वयस्कर, व बाल बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते..

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!