वर्ध्यात सावकारीच्या पैशातून एकाची हत्या : हत्येसाठी वापरली कार

0

 

क्राईम प्रतिनिधी / वर्धा :

उधारीच्या दोन हजार रुपये देता एका 45 वर्षीय पुरुषाचा खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता च्या सुमारास नालवाडी च्या नागसेन नगरात घडली. शंभू देवराव सोनगडे असे मृत व्यक्तीचे नाव असून आरोपी शैलेश येळणे याला वर्धा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शंभू यांची पत्नी जयमाला हिने पल्लवी कोमनकर नामक महिले कडून पाच हजार रुपये उसने घेतले होते , या पाच हजार रुपयांची वसुली करण्याकरीता शैलेशने पल्लवी कोमणकर व त्याचा सहकारी शंभू सोनगडे यांच्या घरी आला होता.

दरम्यान जयमाला हिने तीन हजार रुपये देऊन दोन हजार रुपये काही दिवसांनी देणार असल्याचे सांगत असेल त्याच्या वाद होऊन घरातच हाणामारीचा प्रकार सुरू झाला त्यानंतर शैलेश येळणे घराबाहेर आला त्यांनी आपली कार सुरू केली आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या शंभू याच्या अंगावर चढविले यात शंभू गंभीर जखमी झाल्याने त्याला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे पुढील तपास एपीआय उपासे जमादार राजेंद्र कापसे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!