विदर्भातील पाच जिल्ह्यांसाठी नाशिक दर्शनाची आणि शेगांव दर्शनाची मोठी सुविधा; बडनेरा–नाशिक MEMU आता नियमीत 

0

🔥विदर्भातील पाच जिल्ह्यांसाठी नाशिक दर्शनाची आणि शेगांव दर्शनाची मोठी सुविधा; बडनेरा–नाशिक MEMU आता नियमीत 

🔥खासदार अनुप धोत्रे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश; अवघ्या ७५ ते ८५ रुपयांत नाशिक प्रवासाची सोय, आठवड्याचे सातही दिवस धावणार

अकोला -/ विदर्भातील भाविक आणि प्रवाशांसाठी रेल्वेने मोठी सुविधा उपलब्ध करून दिली असून, बडनेरा–नाशिक रोड MEMU (क्र. ६११२९/६११३०) आता नियमित करण्यात आली आहे. खासदार अनुप धोत्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ही गाडी ०१२११/०१२१२ या क्रमांकाने विशेष गाडी म्हणून धावत होती.

🔥पाच जिल्ह्यांतील प्रवाशांना थेट लाभ

या नियमित रेल्वेसेवेचा अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यांतील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. नाशिककडे जाणाऱ्या भाविकांसह विद्यार्थी, कर्मचारी, व्यापारी आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी ही सेवा आर्थिकदृष्ट्या अत्यंत सोयीची ठरणार आहे.

🔥अवघ्या ७५ रुपयांत नाशिक प्रवास.

बडनेरा ते नाशिक रोड प्रवासासाठी तिकीट सुमारे ७५ ते ८५ रुपये, तर अकोला ते नाशिकसाठी सुमारे ५५ ते ६५ रुपये इतके असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.विशेषतः त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, सिंहस्थ कुंभमेळा, कालसर्प शांती, नारायण नागबली यांसारख्या धार्मिक कारणांसाठी नाशिकला जाणाऱ्या भाविकांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. 

🔥तसेच शेगांवला श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांसाठी सुद्धा हि सेवा अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

🔥आठवड्याचे सातही दिवस सेवा

६११२९ बडनेरा–नाशिक रोड MEMU सकाळी १०.०५ वाजता बडनेरा येथून सुटून सायंकाळी ७.४० वाजता नाशिक रोडला पोहोचेल.परतीची ६११३० नाशिक रोड–बडनेरा गाडी रात्री ९.१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ५.३५ वाजता बडनेरा येथे पोहोचेल. 

🔥ही सेवा आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध राहणार आहे.

🔥प्रमुख स्थानकांवर थांबा

मूर्तिजापूर, बोरगाव, अकोला, शेगांव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव आणि निफाड आदी प्रमुख स्थानकांवर या गाडीला थांबे देण्यात आले आहेत.

🔥खासदार धोत्रे यांनी मानले आभार

या निर्णयाबद्दल खासदार अनुप धोत्रे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. विदर्भातील पाच जिल्ह्यांना नाशिकशी जोडणारी ही नियमित रेल्वेसेवा धार्मिक पर्यटनासह प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर नाशिक आणि बडनेरा येथून शेगांव येथे श्री गजानन महाराजांच्या दर्शनाला येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांना हि सेवा खूप मोलाची ठरणार आहे.

               ब्युरो रिपोर्ट साहसिक        News-/24 अकोला 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!