विद्यार्थ्यांना पीआरए तंत्राच्या साहयाने ग्रामोन्नती साधा- कैलाश बिसांद्रे

0

 

प्रतिनिधी/ वर्धा:

व्यावसायिक समाजकार्याचे शिक्षण आणि प्रशिक्षण घेत असतांना समाजकार्याच्या पध्दती सोबतच तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. पीआरटी तंत्राच्या मदतीने आपण ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग घेऊन सामाजिक. सांस्कृतिक. आर्थिक विकास घडवून आणू शकतो.असे आवाहन डॉ. कैलास बिसांद्रे. यांनी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयात एम.एस.डब्ल्यू व बि.एस.डब्ल्यू द्वितीय सत्राच्या आयोजित पीआरए तंत्र आणि ग्रामविकास या विषयावरील कार्यशाळे प्रसंगी मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य मिलींद सवाई.तर प्रमुख अतिथी डॉ. आनंद प्रकाश भेले.डॉ. सुनिता भोईकर.यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यशाळेत पीआरए यंत्रातून ग्राम नकाशा काढणे.चपाती डायग्राम काढणे.ग्राम समस्या लक्षात क्रमवारी लावणे.प्रथम ज्यलंत समस्येवर उपाययोजना करने.उपलब्ध संसाधनाचा उपयोग करने.शेतीपिक पद्धतीचे नियोजन करणे. आदी विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.मोहनीश सलाई यांनी तर प्रास्ताविक आनंद प्रकाश भेले यांनी केले.प्रा.परमानंद उके व पुष्पा ढगे यांनी संयुक्त रित्या आभार मानले.
प्रस्तुत कार्य शाळेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य मिलिंद सवाई.डॉ. सुनिता भोईकर.डॉ. चेतना सवाई.प्रख.मोहनीश सवाई.प्रा.बी.एन.खेडकर.डॉ. दिपक मरडडे.डॉ. माधूरी झाडे.डॉ. विजया विरणकर.प्रा.प्रविण इंगळे.सचिन मुन.सुनिल खोडे.रूपेश खंते.संजय गुळघाने.रूपेश पाटील. कैलाश सबाने.व विद्यार्थी उपस्थित राहून सहकार्य केले.
समारोपीय सत्रात कोरोना नियम पाळून मान्यवरांच्या हस्ते विदयार्थांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!