शिवसेना(उभाठा)जिल्हा समन्वयक डॉ. उमेश तुळसकर भाजपात दाखल
हिंगणघाट : येथे राजकीय क्षेत्रात एक मोठी हलचल सुरू झाली असून त्याची सुरुवात शिवसेना (उभाठा)चे जिल्हा समन्वयक माजी नगरसेवक डॉ.उमेश तुळसकर यांनी सहकार्यासहित भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून घर वापसी करून केली आहे.
काल दिनांक २५ सोमवार रोजी हिंगणघाट येथील आमदार समीर कुणावर यांचे नेतृत्वात नागपूर येथील देवगिरी या शासकीय बंगल्यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येथील शिवसेना (उभाठा)जिल्हा समन्वयक माजी नगरसेवक डॉक्टर उमेश तुळसकर यांनी आपल्या देवेंद्र पडोळे, रुपेश काटकर,मोहन तुमडाम,रुपेश काटकर व मनोज मिसाळ या सहकार्यासहित भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.दीड वर्षांपूर्वी १० नगरसेवकांनी आमदार समीर कुणावर यांच्याशी फारकत घेऊन शिवसेना मध्ये प्रवेश केला होता हे विशेष. डॉ. तुळसकर स्वगृही परतल्याने शिवसेना (उभाठा)मधील त्यांचे काही सहकारी माजी नगरसेवक भाजपाच्या वाटेवर असल्याचेही चर्चेला उधाण आले आहे
राजू गंधारे सहासिक न्यूज-24