शिवसेना महिला आघाडीच्या शहर संघटिका पदी माया गारसे यांची नियुक्ती

0

प्रतिनिधी / वर्धा:

शिवसेनेच्या महिला आघाडी शहर संघटिका पदी माया गारसे यांची नियुक्ती जिल्हा संघटिका वंदना भुते यांनी पत्र देऊन जाहीर केली.यावेळेस त्यांचे भगवा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणूक लक्षात घेता नुकतीच महिला आघाडीची बैठक शिवसेना कार्यालयात पार पडली या बैठकीच्या अध्यक्षतेखाली जिल्हाप्रमुख अनिल देवतारे होते तर महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका वंदना भुते, तालुका संघटिका भारती कोटंबकर, तालुका प्रमुख गणेश इखार, शहरप्रमुख अँड उज्ज्वल काशीकर,माजी तालुका प्रमुख सतिश नवरखेले,महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिंव्ह बँकेचे निवृत्त शाखाधिकारी राजेंद्र किटे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिलीप भुजाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
माया गारसे यांनी शिवसेनेचे विचार व शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांनी राज्यात जातीय समतोल राखत देशात आदर्श मुख्यमंत्री म्हणून केलेले कार्य घराघरात पोहचवण्यास प्रयत्नशील असल्याचे मत व्यक्त करून संपर्कप्रमुख अनंत गुढे जिल्हाप्रमुख अनिल देवतारे, वंदना भुते यांचे आभार व्यक्त केले तर नियुक्तीबद्दल आदित्य गारसे,अपर्णा गारसे,सविता नासरे,पूजा महाकाळकर, सुकेसणी नानेटकर,प्रविण नंदागवळी आदींसहित प्रसंगी उपस्थितांनी माया गारसे यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!