शिवसेना शाखेचे उबाठा येथे अनावरण.

0

🔥प्रभाग क्रमांक 11 मधील अनेक नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश

सिंदी (रेल्वे) : सेलू नगर पंचायत येथील प्रभाग क्रमांक अकरा येथे नुकतेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेचे अनावरण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख बालू उर्फ श्रीकांत मिरापूर्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. शाखा प्रमुख म्हणून विठ्ठल दंडारे उपशाखा प्रमुख गोलू आर्विकर, सचिव पदी राजू जुलाहिम यांची नियुक्ती करण्यात आली. शाखा उद्घाटन प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुनील पारसे, जिल्हा प्रमुख बालू उर्फ श्रीकांत मिरापुरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पक्षाची धेय धोरण तसेच समोर येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत महविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणायचा, अशी ठाम भूमिका व्यक्त केली. यावेळी शिवसेना सेलू शहर प्रमुख प्रशांत झाडे, उपशहर प्रमुख पिंटू पराते, तालुका समन्वयक योगेश इखार, युवा सेना तालुका प्रमुख पंकज तडस, अतुल काकडे आदी महिला, पुरुष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिनेश घोडमारे सहासिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!