शिविगाळ व विनयभंग प्रकरणी माजी सरपंच महिलेच्या पतीला ७ वर्षाच्या कारावासाची शिक्षा
प्रतिनिधी / वर्धा :
सेलू तालुक्यातील वाहीतपूर येथील महिलेच्या विनयभंग व अश्लिल शिविगाळ प्रकरणी येथीलच माजी महिला सरपंच यांच्या पतीदेवांना ७ वर्षे ३ महिने कारावासाची शिक्षा नुकतीच सुनावण्यात आल्याने सेलू सेलू तालुक्यात खळबळ मचली आहे.
सविस्तर वृत्त असे की, वाहीतपूर येथील सुभाष डायगव्हाणे यांची पत्नी सरपंच असतांना बायको नामधारी पती कारभारीचा कार्यभार सुरु होता. पत्नी सरपंच असल्याचा ताव अंगात आणुन नको ते काम करण्यास सुभाष नामदेवराव डायगव्हाणे याने सुरु केले. त्यामुळे अनेकांसोबत वाद घालून माझी पत्नी सरपंच आहे मी काहीही करु शकतो तुम्ही माझे काहीच बिधडवू शकत नाहीच्या तोर्यात यांनी गावातील आपल्याच नात्यातील महिलेला त्रास दयायला सुरुवात केली. इतकेच नाही तर त्या महिलेला अश्लिल शिविगाळ करुन तीला जीवे मारण्याची धमकी देवून तिचा विनयभंग सुध्दा केला. या घटनेची माहिती पिडीतेने अपल्या पतीला दिली असता त्यांनी या प्रकरणाची तक्रार सेलू पोलिस स्टेशनला केली. त्या तक्रारी वरुन हे प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपी व पिडीतेची बाजु एैकुन घेतली. त्यामध्ये आरोपी सुभाष डायगव्हाणे यांनी पिडीत महिलेने केलेल्या तक्रारीत सत्यता आढळून आली. तसेच न्यायालयाने पिडीतेवर झालेल्या अन्यायाचे साक्षदार तपासले असता तक्रारीत सत्यता आढळुन आल्याने आरोपी आरोपी सुभाष डायगव्हाणे याला ७ वर्षे ३ महिण्याची सजा सुनावली. सोबतच २५ हजार रुपयाचा दंडे सुध्दा ठोठावण्यात आला. परंतु आरोपी सुभाष डायगव्हाणे याने पैशाच्या जोरावर पुन्हा वरिष्ठ न्यायालयात अपिल दाखल केली. कीतीही पैसा फेकला तरी सत्याचा विजय होतोच असेच या प्रकरणात झाले. वरिष्ठ न्यायालयाने पुन्हा या प्रकरणाचा तपास करुन खरच पिडीतेव अन्याय झाला का पुरावा गोळा केला असता न्यायालयासमोर झालेली घटना सत्य असल्याचे सिध्दा झाल्याने न्यायालयाने पहिल्यांचा सुनावण्यात आलेल्या सजेला कायम ठेवत आरोपीला एकाच वेळी पुर्ण सजा तसेच २५ हजाराच्या दंडा पैकी २० हजार रुपये पिडीतेला देण्यास सांगीतले व उर्वरित ५ हजार रुपये कोर्टात जमा करण्याचा आदेश पारित केला.