शेंद्री येथील युवा शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

देवळी ता.प्रतिनिधी:-सागर झोरे
शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे
देवळी तालुक्यातील सेंद्रि गावांमध्ये राहणारे युवा शेतकरी महेश बाबाराव हांडे वय 36 वर्ष यांनी सततची नापिकी व कर्जाचा वाढता डोंगर त्यामुळे जीवनाला हातात घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याची माहिती शेंद्री येथील सामाजिक कार्यकर्ते अमर तीनघसे यांनी दिली आहे
महेश हांडे यांच्यावर ईलाबाद बँकेचे एक लाख रुपयांचे कर्ज असून कृषी केंद्राचे सुद्धा 92 हजारांचे कर्ज असल्याची माहिती मिळत आहे
घरी कोणी नसताना महेश हांडे यांनी आज 13 डिसेंबर सोमवारी विष प्राशन केले
त्यांना पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने नेण्यात आले परंतु त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे या घटनेने सेंद्रिय गावांमध्ये हळहळ व्यक्त होत असून मृतकाच्या मागे दोन मुली आई-वडील पत्नी असा आप्त परिवार आहे