शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय बजेट नुकसानीचे – भिम टायगर जिल्हा अध्यक्ष विशाल रामटेके

0

 

प्रतिनिधी / वर्धा :

 

देशातील गरीब,मध्यम व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनी जानेवारी महिन्यातच १लाख ४० हजार कोटी रुपये फ्कत जी एस टी सरकारच्या तिजोरीत जमा केला आहे.पण त्यांच्यासाठी बजेट मध्ये काहीच सूट नाही.आयकर त सरकारने कोठेही बदल केले नाही. जी एस टी च्या त्रासातून व्यापाराची सुटका झाली नाही.

२०१६ पासून शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करण्याची घोषणा झाली आहे.पण गेल्या सहा वर्षांत त्याला भाव मिळू शकला नाही.उत्पादन कमी झाले तरच, शेतकऱ्याला भाव मिळतो.तोही खाजगी व्यापाऱ्याकडून यात सरकारी खरेदी केंद्रे बंद पडली आहे.

सोयाबीन ६०००-/ कापूस १००००/- तूर, मुग यांची एम एस पी निश्चित केली असती तर,खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला भावाचा आधार मिळाला असता.

एकंदरीत बजेट सुंदर दिसत असले तरी, समाधानी नाही. शेतकऱ्यांच्या आतापर्यंतचे शेतीचे नुकसान झाले किंवा त्यांच्या पिकाचे नुकसान झाले ते या बजेटमध्ये घ्यायला पाहिजे होते. तसे या केंद्र सरकारने केले नाही.. शेतकऱ्यांसाठी हे सरकार नेहमीच नुकसानीचे ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!