वर्धा -/जिल्ह्यातील रोठा येथे श्रावस्ती बुद्ध विहारा मध्ये आज दिनांक 6 डिसेंबर 2024 ला सकाळी नऊ वाजता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन सिद्धार्थ शंभरकर यांनी केले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्माकर कांबळे सामाजिक कार्यकर्ता तथा प्रबोधनकार व महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे वर्धा जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प माला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध कवी श्री.प्रकाश जीदे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व मार्गदर्शन पर सविस्तर विचार प्रगट केले.रोठा येथील ग्रामपंचायत सदस्य आशिष कोल्हे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम बुद्ध भीम वंदना घेण्यात आली. त्यानंतर पद्माकर कांबळे यांनी डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर त्यांनी महापरिनिर्वाण दिनाचे गीत सादर केले. यावेळी वार्डातील बुद्ध उपासक व उपाशीका प्रामुख्याने उपस्थित होत्या कार्यक्रमाला सहकार्य करण्याकरिता सिद्धार्थ शंभरकर , राजेश कांबळे, प्रशांत शंभरकर, बंडूजी ताकसांडे, नितीन कांबळे व महिला मंडळाच्या सौ. शितल राहुल शंभरकर, यशोदाबाई गोडघाटे, सौ मंदाबाई ज्ञानेश्वर वाघमारे असे अनेक बुद्धउपासक व उपशिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.