पळसगाव (बाई) येथे नवरात्र उत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
🔥 यंदा मंदिरात ४७५ अखंड ज्योती रेवणार!
🔥 मंदिरात भाविकांची उसळणार गर्दी
सिंदी (रेल्वे) : नजीकच्या श्री. संत सखुआई मंदिर, श्रीक्षेत्र नारायण धाम पळसगाव (बाई) येथे सालाबादप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सव परंपरेनुसार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यावर्षी ४७५ अखंड ज्योती रेवणार असून रोज सकाळी श्री. संत सखुआई व जगदंबेची महाआरती होते. तसेच रोज रात्री महिला रास गरबा फेर धरतात. नवरात्रोउत्सवानिमित्य श्री. संत सखुआईचा परिसर विद्युत रोषणाई व आकर्षक सजावटीने नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. नवरात्रोत्सवात या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळणार आहे.
श्री. संत सखुआईच्या वास्तव्याने पळसगाव (बाई) हे गाव पावन झालेली भूमी आहे. संत सखुआईचे सत्व असल्याने याठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात मंदिरात दर्शनासाठी गर्दी असते. जगत माता अंबिका मातेच्या प्रगटदिनापासून सलग ९ दिवस अखंड ज्योती रेवत असतात. ही परंपरा मागील सण २०१३ पासून सुरू आहे. मागीलवर्षी ४५१ अखंड ज्योती पेटविण्यात आल्या होत्या. यंदा केवळ पळसगाव नव्हे तर वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील भक्तांकडून ४७५ अखंड ज्योती पेटविल्या जाणार आहेत. देवस्थानच्या वतीने सर्व जातीधर्माच्या भक्तांना येथे प्रवेश दिला जातो.१५ ऑक्टोबर पासून मंदिरात पूजा-अर्चना तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. अखंड ज्योती स्थापना सहयोग राशी रुपये ६०१ अखंड ज्योती नोंदनिकरिता मंदिरात संपर्क करावा, असे आवाहन श्री. संत सखुआई, श्रीक्षेत्र नारायण धाम पळसगाव (बाई) समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
रोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
या नवरात्रोत्सवात ९ दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. त्यामध्ये दिनांक १५ ऑक्टोंबर मंगळवारला सकाळी ११.३० घटस्थापना व महाआरती, दिनांक १९ ऑक्टोबर मंगळवारला दुपारी २ वाजता सामुहीक अखंड ज्योती घट स्थापना, ६.०० व सायंकाळी ७.३०ला महाआरती, रोज सायंकाळी ५.१५ ला लंगर कार्यक्रम, रोज सायंकाळी ८.४५ ला गरमा नृत्य कार्यक्रम, रोज रात्री ९.३० ला भजन पुजा देवीजागरण कार्यक्रम,१८ ऑक्टोबर रोज बुधवार रात्री ९ वाजता, अष्टमीला दुपारी २ वाजता हवन पूजन आणि २४ ऑक्टोबर रोजी घट विसर्जन मिरवणूक रात्री ९ वाजता काढण्यात येणार आहे.
दिनेश घोडमारे सहासिक न्युज- 24