संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रपटाची टिम वर्धेत…

0

 वर्धा.-/ मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारित बनविलेला चित्रपट “संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील” दिनांक 21 जून 2024 या प्रमोशनदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.या चित्रपटाच्या कलाकारासह संपूर्ण टिम शुक्रवारला वर्धेत आली होती.कलाकारांचे मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरूण जगताप यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली.क्षत्रिय मराठा समाज आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि चर्चा करण्यात आली.मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची टिम राज्याच्या दौऱ्यावर असताना संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचा टीमचे वर्धा येथे आगमन झाले असता सर्व समाज बांधवांकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि चित्रपटाला चांगला प्रतिसाद देऊ असा विश्वास देण्यात आला.यावेळी संघर्ष योद्धाच्या भूमिकेत असलेले रोहन पाटील दिग्दर्शक दोलताडे यांनी चित्रपटाविषयी माहिती देऊन सर्व समाज बांधवांनी आवर्जून हा चित्रपट बघावा असे सांगितले.यावेळी क्षत्रिय मराठा समाज संस्था वर्धा चे अध्यक्ष प्रमोद खंडागळे, उपाध्यक्ष संदीप भांडवलकर, सचिव नितीन शिंदे,माजी अध्यक्ष पुखराज मापारी,एड.अभय शिंदे,आशिष जाचक,अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष अरुण जगताप, विनय जगताप,प्रा.उमाकांत डुकरे, प्रदीप रहाटे,बाळासाहेब इंगोले, शरद हिवाळे, प्रणय कदम, अमोल वाघ,देशांशी जगताप ,प्रणय कदम, ऋषिकेश जगताप, संदीप गिते,निरज जगताप,चंर्यारकांत वाडेकर,धनंजय बावणकर,अंकिता जगताप या सह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

गजेंद्र डोंगरे साहसिक न्यूज -/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!