संपादक रविंद्र कोटंबकर यांच्यावर केलेल्या हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत कारवाई करावी- पत्रकार संरक्षण समिती

0

प्रतिनिधी / वर्धा :

पत्रकार रवींद्र कोटबकर यांच्यावर जीवघेणा हल्ला सोमवारी ता. 18 रात्री अज्ञात हल्लेखोरांनी केला याचा पत्रकार संरक्षण समितीने निषेध व्यक्त केला.
आज वर्धा येथे पत्रकार संरक्षण समितीच्या पदाधिकारी यानी 20 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले .
रविंद्र कोटंबकर यांच्यावर केलेल्या हल्लेखोरांना तत्काळ अटक करा, हल्ल्यामागीला सूत्रधार यांचाही शोध पोलिसांनी घावा, आरोपींवर आणि सुत्रधारावर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष रविराज घुमे,सचिव योगेश कांबळे,कार्याध्यक्ष सत्तार शेख, उपाध्यक्ष संजय धोंगडे , दिलीप पिंपळे,संदीप रघाटाटे, जमीर शेख, वर्धा तालुकाध्यक्ष प्रशांत अजनकर, बाळा चतारे, सागर झोरे, सचिन वैद्य, संजीव वाघ, पवण चुंबलवार यांच्यासह असंख्य पत्रकार उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक यांनी हल्लेखोरांच्या शोधत पोलीस काम करीत असून लवकरच त्यांचा छडा लावला जाईल असे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!