संशयाच्या कारणावरून पतीने केली पत्नीची हत्या
भुगाव येथील उत्तम गालवा कंपनीच्या समोरील दुकानाच्या चाळीत झालीय हत्या
– उत्तम गालवा कंपनीच्या समोर घडला थरार
प्रतिनिधी/ वर्धा:
वर्ध्यात भुगाव नजीक उत्तम गालवा कंपनिसमोर असलेल्या हॉटेलच्या चाळीमध्ये पतीने संशयावरून पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. रागाच्या भरात पती आणि पत्नीचे भांडण झाले ते विकोपाला गेले, पतीने भुगाव येथील खानावडीसमोर पत्नीच्या डोक्यात बॅटने वार केले, डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे.
मूळचे पुलगाव येथील असणारे कैकशा आणि इम्रान हे दोघे गेल्या काही वर्षांपासून भुगाव येथील उत्तम कंपनीच्या समोर आपला भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करीत होते. तर इम्रान हा ट्रक ड्रायव्हर होता. कैकशा ही आईसोबत घरी राहत होती. दरम्यान दररोज यांच्यात वाद होत होता. संशयाच्या कारणावरून मंगळवारी देखील पती आणि पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. पतीने बॅटने पत्नीच्या डोक्यावर वार केले. त्यानंतर दगळाने देखील वार केले. यात कैकशा इम्रान खान हीचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सावंगी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी इम्रान याला अटक करण्यात आली आहे.