संसाधन व्यक्ती पदासाठी अर्ज आमंत्रित
प्रतिनिधी / वर्धा :
आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री खाद्य उद्योग उन्नयन योजनेच्या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत जिल्हा स्तरावर लाभार्थ्यांचा पाठपुरावा व हाताळणी सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तीची नामिकासुची तयार करण्यात येणार आहे. यासाठी अन्नतंत्रज्ञान, अन्न अभियांत्रिकी मधील पदविका, पदवी अथवा कृषि पदवीधर अथवा सनदी लेखापाल ज्यांना सविस्तर शासकीय प्रकल्प अहवाल तयार करण्याचा अनुभव आहे, अशा व्यक्तींकडून संसाधन व्यक्ती पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अशा इच्छुक व्यक्तींनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.