संस्थाचालक किनकरच्या हेकेखोरपणामुळे चार विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

0

सचिन धानकुटे / सेलू :

येथील इंग्रजी माध्यमाच्या किनकर कॉन्व्हेंटमध्ये सध्या ऑनलाईनसह ऑफलाईन शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू असल्याने दहावीच्या चार विद्यार्थ्याचे भवितव्य धोक्यात आले आहे. शिक्षणाऐवजी लक्ष्मीलाच अधिक प्राधान्य देणाऱ्या या मुजोर संस्थाचालकामुळे पालकवर्गात सध्या संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवनित बहुउद्देशिय संस्था द्वारा संचालित किनकर इंटरनॅशनल स्कुलमध्ये दहावीपर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. परंतु येथे आवश्यक असा शिक्षकवर्गच उपलब्ध नाही. येथील प्राचार्याचे अठरा महिने वेतनच न झाल्याने त्यांनी शाळेला अखेरचा रामराम ठोकला. त्यामुळे येथील दहावीच्या चार विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची पाळी आली. गणितासह सायन्स या दोन विषयासाठी येथे सध्या शिक्षकच उपलब्ध नाहीत. जे आहेत त्यांचे वेतन होत नसल्याने त्यांची विद्यार्थ्यांना शिकविण्याची मानसिकता नाही. त्यामुळे आधी ऑनलाईन तर नंतर ऑफलाईन शिक्षणाचा पार खेळखंडोबा झाला आहे.
याविरोधात पालकांनी दंड थोपटले असता अडाणचोट संस्थाचालकाने अस्सल गावरान भाषेचा वापर करित पालकांचा चांगलाच पाणउतारा केला. यासंदर्भातील संभाषण ऐकले असता या ढोरक्याला संस्थाचालक तरी कोणी केले..? असा सवाल उपस्थित होतो. शिक्षणात अडथळे निर्माण होत असल्याने पालकांनी शाळा सोडण्याचा दाखला मागितला तर तेथेही या अडाणचोटाने त्यांना वेठीस धरले. त्यामुळे शिक्षणाऐवजी केवळ पैश्याला प्राधान्य देणाऱ्या या भिकारचोट संस्थाचालकांवर कारवाईची मागणी पालकंवर्गाकडून होत आहे. या सगळ्या प्रकारात मात्र दहावीच्या “त्या” चार विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असल्याचे स्पष्ट दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!