समुद्रपूर नगरपंचायतच्या 15 जागेकरिता 82 टक्के मतदान

0

 

इक्बाल पहेलवान / हिंगणघाट :

समुद्रपूर नगरपंचायतीची मतदान प्रक्रिया 21 डिसेंबर रोजी सकाळपासून शांततेत सुरु झाली. शहरातील 6 केंद्रावर 15 बूथ कार्यान्वित करण्यात आले असून 67 उमेदवारांचे भाग्य इव्हीएम मशीन बंद केले असून 19 जाने. ला होणाऱ्या मतमोजणीत कोणाला लॉटरी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
मतदान प्रक्रीया सुरु असतांना समुद्रपूर पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संवेदनशील मतदान केंद्रावर सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली होती.नगरपंचायतीच्या 15 जागेकारिता 67 उमेदवार रिंगणात आहे तर 5 हजार 750 मतदार आहेत.
20 डिसेंबर रोजी पर्यंत सर्व पक्षांच्या प्रचार रॅली, सभा, गुप्त बैठका, कार्नर बैठका अशा विविध प्रकारे प्रचार यंत्रणा प्रत्येक पक्षाकडून राबवण्यात आली. निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, मनसे, प्रहार जनशक्ती पक्ष, बहुजन समाज पार्टी, संभाजी ब्रिगेड या पक्षाचे उमेदवार रिंगणात आहे. आज सायंकाळी 5.30 वाजता उमेदवारांचे भाग्य मतदान पेटीत बंद होणार आहे. निवडणूक यंत्रणेकडून चोख बंदोबस्त कायम होता.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, सहाय्यक निवडणूक अधिकारी अनिल जगताप, प्रशासकीय अधिकारी पवन धुमाळे ,अभियंता अखिलेश सोनटक्के, लेखापाल हर्षल कांबळे ,अभियंता पवन वाटकर, संगणक अभियंता विशाल ब्राह्मणकर, अनिल नासरे ,नरेश वानकर,तलाठी शंभरकर, तलाठी काटेवार,ढाकणे, अक्षय पुनवटकर, अंकुश आडकिने ,उमेश फटिंग, श्रीकांत आगलावे, भावना ढाकरे, विजय घुगसे, मंगेश मेंडूले, विजय सरोदे आदींनी निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!