सागर चौधरीची अवकाश भरारी ; इस्त्रोमध्ये वैज्ञानिक म्हणून निवड

0

मुक्ताईनगर / पंकज तायडे :

बहुतांश विद्यार्थी परिक्षेच्या तयारीसाठी शहराकडे जातात. मात्र कोथळी येथील सागर चौधरी या तरूणाने चांगली नोकरी सोडून थेट आपल्या गावाचा रस्ता धरला. येथे अहोरात्र अभ्यास करून खूप मेहनत घेतली. याचेच फळ म्हणून त्याची भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोमध्ये वैज्ञानिक म्हणून निवड झाली आहे. गावच्या मातीतून अवकाशात भरारी घेण्याची जिद्द बाळगणार्‍या आणि याच्या पूर्ततेसाठी परिश्रमांची पराकाष्ठा करणार्‍या सागर चौधरी या वैज्ञानिकाचा माझी महसुल मंत्री एकनाथ खडसे यांनी सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!