सामान्य बहुजन, एससी ,एसटी ,आदिवासी ओबीसी भटके यांना शिक्षणाचे प्रवाहात आणण्याचे श्रेय राष्ट्रवादीचे शरद पवार यांचेच…

0

Byसाहसिक न्युज 24
प्रतिनिधी/ वर्धा:
महात्मा ज्योतीबा फुले,सावित्रीबाई फुले, शाहु महाराज,डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहूजनांसाठी शिक्षणाची मुहुर्तमेढ केली. पण नवा विज्ञाननिष्ठ सुसंस्कृत आणि शिक्षित महाराष्ट्र निर्माण करतांना, व सामान्य बहुजन,,एससी,आदिवासी, ओबीसी भटके,यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे श्रेय राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचे आहे.त्यांनी मुख्यमंत्री असतांना शासनाच्या वतीने विविध मोफत शिक्षणाच्या योजना सुरू करून,सर्व जातीपातीच्या सामान्य लोकांना शिक्षण मिळावे, म्हणुन त्यांच्या प्रयत्नाने व प्रोत्साहनाने बार्टी आदिवासी संशोधन, सारथी व ओबीसींच्या महाज्योतीची स्थापना झाली. त्याच्या माध्यमातुन सर्व समाजातील विद्यार्थ्यांना, युपीएससी, एमपीएससी, पीएचडी संशोधक, जेईई निट, स्कील डेव्हलपमेंट अशा विविध स्पर्धा परीक्षेचे मोफत प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळत आहे.ओबीसींच्या १०० विद्यार्थ्यांसहीत परदेशातील शिक्षणासाठी पन्नास लाखापर्यंत मोफत प्रति विद्यार्थी शिष्यवृत्ती देण्यात येते.त्यांच्याच आदेशाने महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाज्योतीला ६२४ कोटी, सारथीला ६०० कोटी, बार्टीला २००० कोटी व आदिवासी संशोधन संस्थेला १५०० कोटी रूपयाचा निधी केवळ विद्यार्थ्यांच्या मोफत विविध योजनांसाठी दिलेला आहे.
त्यातुनच ह्या सर्व योजना सुरू आहे. आपण या योजनांचा लाभ घ्यावा, व आपण परीक्षेत जे दैदिप्यमान यश मिळविले, त्याबाबत राष्ट्रवादीचे वतीने आपले अभिनंदन आहे, असे राष्ट्रवादीच्या वतीने गूणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी सांगीतले.
यशवंत महाविद्यालय वर्धा येथे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने वर्ग १० व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजित केलेला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार सुरेश देशमुख हे होते. तर प्रमुख अतिथी जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, लक्ष्मीनारायण सोनवणे, धनराज तेलंग, संदिप किटे हे होते, सुरेश देशमुख यांनी आपल्या भाषणातुन शरद पवार व यशवंतराव चव्हान यांच्या प्रेरणेमधुनच,वर्धा जिल्ह्यातील सर्व गावागावात शाळांची निर्मिती बापुरावजी देशमुख यांनी केली. यशवंत महाविद्यालयाची स्थापना झाली. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कार्यच हे सामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे हे आहे,विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. तर जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत यांनी वर्धेच्या पक्ष कार्यालयात विद्यार्थी समाधान कक्ष सुरू केला असुन, कुठल्याही विद्यार्थ्यांना प्रवेश, जात प्रमाणपत्रे , आणि कुठलीही प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी अडचणी येत असतील, तर त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात, फार्म भरून देवुन, आपली अडचण सांगावी! दर सोमवारी विद्यार्थी समाधान शिबिरात संबंधितांशी संपर्क करून ती सोडविण्यात येईल असे सांगीतले.या वेळी लक्ष्मीनारायण सोनवणे, धनराज तेलंग, यांचीही समयोजीत भाषणे झाली.
या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह,देवुन मान्यवरांचे वतीने सत्कार करण्यात आला. यासाठी विद्यार्थी विद्यार्थींनी व त्यांचे पालक फार मोठ्या संखेने कार्यक्रमाला उपस्थित होते,
या कार्यक्रमासाठी माजी आमदार सुरेश देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत , प्रदेश उपाध्यक्ष प्रा. दिवाकर गमे, लक्ष्मीनारायण सोनवणे, धनराज तेलंग, संदिप किटे, सुरज वैद्य,वासुदेव कोकाटे, प्रा. खलील खतिब, निळकंठ पिसे,विशाल हजारे, विनोद पांडे, अंबादास वानखेडे, संदिप भांडवलकर, निळकंठ राऊत,प्रणय कदम, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संखेने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!