साळीवर, पत्नीवर वाईट नजर टाकणे पडले महागात.

0

क्राईम प्रतिनिधी/वर्धा

पूर्वीच्या काळी मित्र म्हटले कि जीवाला जीव देणे असे समजल्या जात होते, परंतु काळ बदलत गेला. त्याप्रमाणे मनुष्याच्या सवयी, इच्छा ह्या पण बदलत गेल्या. पूर्वी मित्राच्या पत्नीला आईचा दर्जा दिला जात होता. परंतु आता मित्राच्या पत्नीवरच वाईट नजर टाकल्याने मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना हिंगणघाट रेल्वे स्टेशनवर घडली.                        बोरगाव मेघे येथील दीपक चौधरी हा व त्याचा मित्र दीपक यादव यांची मागील काही वर्षापासून मैत्री होती. त्यामुळे    दोघांचे एकमेकांच्या घरी जाणे-येणे होते. या संधीचा फायदा घेऊन दीपक चौधरीने आपल्याच मित्राच्या पत्नीवर व साळी वर लक्षकेंद्रित करून वाईट नजर टाकण्यास सुरुवात केली. काही दिवस असेच सुरु राहिले एके दिवशी दीपक यादव च्या पत्नीच्या लक्षात आले की हा माझ्याकडे वेगळ्या भावनेने बघतो. त्यामुळे तिने लगेच ही गोष्ट पतीला सांगितली. परंतु दीपक यादवने या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आपला मित्र असा करूच शकत नाही, असे त्याला वाटले. घटनेच्या 2 दिवशी पूर्वीच दीपक चौधरीने दिपक यादवची भेट घेतली व तुझी पत्नी मला खूप आवडते, मी तिच्यावर प्रेम करतो. त्यामुळे तू बाजूला हो तसे होत नसेल तर तुझ्या साळीचे लग्न माझ्यासोबत करून दे असे म्हटले या वरून दोघांमध्येही चांगलाच शाब्दिक वाद झाला. दोघेही एकमेकांचा राग मनात धरुन तेथून निघून गेले. परंतु दीपक यादवच्या हृदयात ते शब्द घर करून राहिले. त्यामुळे दीपक यादवने मित्राला संपविण्याचा कट रचला त्यानुसार त्याने दीपक चौधरीला हिंगणघाट रेल्वे स्टेशन पासून काही अंतरावर रेल्वे पटरीवर भेटण्यास बोलाविले. त्याठिकाणी दीपक चौधरी येताच त्याला लोखंडी रॉडने हातापायाला मारून गंभीर जखमी केले. व समोरून येणाऱ्या रेल्वे गाडीच्या समोर ढकलून दिले. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. परंतु आपल्या मित्राचा मृत्यू रेल्वे समोर सेल्फी काढण्याच्या नांदात झाला. असल्याचे त्याने भासविले. व तसाच बयान पोलिसांनाही दिला पोलिसांनी प्रथम दर्शनी मृतदेहाचा पंचनामा करून हिंगणघाट पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करून. कलम 174 जा. फो. नुसार मर्ग दाखल केला व तपास सुरू केला. घटनास्थळाचा पंचनामा व पोस्टमॉर्टम रिपोर्ट वरून पोलिसांना लक्षात आले की हा अकस्मात मृत्यू नसून हत्याच आहे. त्यावरून पोलिसांनी आपली तपास चक्रे फिरवली व दीपक यादव वरती पाळत ठेवली. दीपक यादव च्या हालचालीवर संशय आल्याने त्याला ताब्यात घेतले व त्याला सुंदरीचा महाप्रसाद दिला त्यानंतर तो पोपटासारखा बोलू लागला. व माझा मित्र दीपक चौधरी याने माझ्या पत्नीवर व साळीवर वाईट नजर टाकल्याने मी त्याचा खून केला. तसेच खून करण्याचा पुरावा सुद्धा नष्ट केला असे पोलिसांसमोर कबुली दिल्याने पोलिसांनी आरोपी दीपक ऊर्फ तेजसिंग यादव रा. शास्त्रीवार्ड हिंगणघाट यास कलम 302 तसेच पुरावा नष्ट करणे कलम 201 भांदवी नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली ही सर्व कारवाई दबंग पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर अप्पर पोलीस अध्यक्ष यशवंत सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यांच्या निर्देशाप्रमाणे पी.एस.आय सौरभ घरडे, पी.एस.आय गोपाल ढोले, पोलिस जमादार स्वप्नील भारद्वाज, विकास अवचट, संघसेन कांबळे, दिनेश बोथकर, राकेश आष्टनकर, मनीष कांबळे यांनी केली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!