सावधान…! देहू-आळंदी पार्कमध्ये सोयीसुविधांचा अभाव; मात्र प्लॉटधारकांना गंडविण्यासाठी उपहार योजनेचे चॉकलेट

0

सचिन धानकुटे / सेलू :

सेलू येथील शहराच्या हद्दीसह आजूबाजूच्या परिसरात सध्या अवैध ले-आऊटचा गोरखधंदा चांगलाच तेजीत आला आहे. प्लॉट धारकांना गंडविण्यासाठी ले-आऊट मालकांनी भव्य उपहार योजनेसह विविध प्रकारच्या प्रलोभनांचे आमिष देत कंबर कसली. परंतु या सगळ्यात ले-आऊट मधील सोयीसुविधांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले असून ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता बळावली आहे.
शहरालगत ग्लोबल रियल इस्टेट अँड सर्व्हिसेसच्या मानकर कंपनीने अवैध ले-आऊटची दुकानदारी थाटली आहे. मौजा सेलू येथील सर्व्हे नंबर ५०,५१ मध्ये देहू-आळंदी पार्क नामक अवैध ले-आऊट निर्माण केले आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध आमिष दाखविण्यात आले. यात भव्य उपहार योजनेचा देखील समावेश आहे. जो आजपर्यंत एकाही ले-आऊट मालकाने धडपणे पूर्ण केला नाही. केवळ प्लॉट विक्री करण्यासाठी व ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी निव्वळ चॉकलेट दिले जाते. दिर्घ मुदतीच्या नावाखाली वेठीस धरले जाते. एवढेच नाही तर अनेक आश्वासने दिली जातात. मात्र सदर ले-आऊटमध्ये प्रत्यक्षात सोयीसुविधांचा अभाव असतो. असाच काहीसा प्रकार देहू-आळंदी पार्कमध्ये सध्या सुरू आहे. प्रॉस्पेक्टमध्ये दिलेल्या दहा आश्वासनापैकी धड एकाही आश्वासनाची पूर्तता न करताच प्लॉट विक्रीचा गोरखधंदा सुरू करण्यात आला. याकरिता मानकर कंपनीने चार पंटरची नेमणूक केली असून ते दिवसभर ग्राहकांना गंडवित असतात. त्यामुळे ग्राहकांनी अशा भामट्यांपासून वेळीच सावध होत काळजी घेण्याची गरज आहे.

*उपहार योजनेच्या आमिषाला बळी पडत अनेकांची फसवणूक*

शहरात याआधीही ग्राहकांना उपहार योजनेचे चॉकलेट दाखवून अनेकांची फसगत करण्यात आली. एवढेच नाही तर साधा विजपूरवठा देखील करण्यात असमर्थता दाखवली. सोयीसुविधांच्या बाबतीत तर विचारुच नका प्रत्यक्ष अनुभव घ्या आणि बघा काय हाल आहेत ले-आऊटचे अशी एकंदरीत परिस्थिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!