साहसिक समूहातर्फे मिठाई व प्रदूषनमुक्त फटाक्याचे वाटप

0

साहसिक वृत्त:/प्रतिनिधि वर्धा:

शहरामध्ये असलेल्या विविध गरीब जनतेची दिवाळी गोड व्हावी याकरिता दैनिक सहसिक तसेच सहसिक न्यूज 24 या वृत्त वाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी विल्सन मोखाडे यांनी त्यांना मिठाई व प्रदूषण मुक्त फटाके देवून त्यांच्या सोबत दिवाळीचा आनंद साजरा केला…

शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात, बस स्थानक परिसर तसेच इतवारा परिसरातील पार्डी बेड्यावर्ती त्यांनी तिथे जाऊन तेथील मुलांसोबत दिवाळी साजरी करत त्यांना मिठाई तसेच प्रदूषण मुक्त फटाक्याचे वाटप केले यामुळे त्या परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते या कार्याला सहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कोटंबकार यांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!