साहुर आष्टी /तालुक्यातील साहूर येथील जाम नदीवर बोरखडी शिवारात जाण्याकरिता कोटी रुपयाचे दोन कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले हे बंधारे जगदंबा कन्स्ट्रक्शन नागपूरच्या ठेकेदारामार्फत एक वर्षापुर्वी बांधण्यात आले परंतु त्यांचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून त्या ठिकाणी माती मिश्रित रेतीचा वापर करण्यात आला आणि सिमेंटचा अतिशय कमी वापर करून बांधकाम केले त्यामुळे केवळ एक वर्षातच या बंधाऱ्याचे तुकडे तुकडे खाली पडायला लागले व सरळ गिट्टि बाहेर निघत असल्याचे दिसून येत आहे आता त्यावर सिमेंटचे पाणी मारून चोपडे करण्याचे काम सुरू आहे त्यामुळे समोर शेतकऱ्यांच्या जीवाला धोका असून हे बांधकाम कधी कोसळेल हे सांगता येत नाही हे बांधकाम मृद व जलसंधारण विभाग नागपूर उपविभाग आर्वी च्या माध्यमातून करण्यात आले हा बंधारा बांधते वेळी शेतकऱ्यांनी तक्रारी सुद्धा केल्या होत्या परंतु त्याकडे दुर्लक्ष करीत हे बांधकाम करण्यात आले व या विभागाचे जेई ससाने यांनी याकडे साप दुर्लक्ष करीत हम करे सो कायदा अशी भूमिका घेतली त्यामुळे हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असून याची चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता शेतकरी करणार असल्याचे शेतकऱ्यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.