सुकळी शेतशिवारात एकाच रात्री बोअरवेल मधून दोन मोटर चोरट्यांनी केले लंपास
प्रतिनिधी / कळंब:
तालुक्यातील सुकळी (पार्डी) शिवारातील चोरट्यांनी एकाच रात्री बोअरवेल मधून दोन मोटर पंप चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
नागशेन महादेव सुटे रा. सुकळी (पार्डी) व आकाश किशोर रोडे रा. हिवरा (दरने) असे मोटर चोरी गेल्या शेतमालकाचे नांव आहेत, आकाश रोडे हा नेहमी प्रमाणे सकाळच्या वेळेस शेतात चण्याला पाणी देण्यासाठी गेला पंरतु मोटार का सुरू होत नाही म्हणून तो बोअर जवळ गेला असता तिथे फक्त त्याला तुटलेला केबलच दिसला त्यामुळे त्यांच्या लक्षात आले की आपली बोअर मधील मोटर चोरीला गेली आहेत, त्यातच नागशेन सुटे या शेतकऱ्या बरोबर सुद्धा असेच घडले तेव्हा दोघांनी शोधायला सुरुवात केली, पंरतु मोटरचा कुठेही शोध लागला नाही.
त्यांनी पोलीस स्टेशन गाठले पंरतु तिथे तर वेगळाच प्रकार घडला तक्रार घेण्या ऐवजी पोलीस कर्मचारी त्यांना ऊलट सुलट भाषेत उत्तरे द्यायला लागली तुम्ही अगोदर शोध द्या नंतर आम्ही पाहु काय करायचे आहे
शेतकऱ्यांना धिर देण्याऐवजी त्यांना उलट सुलट उत्तरे दिली जातात काही वेळा त्यांनी मात्र शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका पाहून शेवटी ठाणे अमलंदाराने त्यांनी रितसर तक्रार दाखल केली. पोलीस प्रशानाच्या अश्या वागनुकीमुळे शेतकरी वर्गात प्रचंड रोश पाहायला मिळत आहे. खरोखरच पोलीस चोरट्यांना लवकरात लवकर जेरबंद करेल का? असा प्रश्न शेतकरी वर्गात पडला आहे.