सेलूत नगरपंचायत निवडणुकीच्या निकालावरून सट्टाबाजाराला उधाण

0

 

प्रतिनिधी/ सेलू :

येथील नगरपंचायतच्या १३ प्रभागांची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली असून निकालानंतर सट्टाबाजाराला शहरात चांगलेच उधाण आले. शहरातील सटोड्या मयुरचा सध्या जय-पराजयासाठी दिवसरात्र बोभाटा सुरू असल्याने यावर अंकुश ठेवण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
नगरपंचायतीच्या १३ प्रभागासाठी मंगळवारी मतदान पार पडले. उर्वरित चार प्रभागासाठी १८ जानेवारीला मतदान होणार आहे. परंतु दरम्यान ज्या प्रभागांची निवडणूक पार पडली त्यावरून शहरात जय-पराजयासाठी आकडेमोड सुरू झाली आहे. याच आकेडमोडीचा फायदा उचलण्यासाठी येथील “मयुर” नामक सटोड्या सध्या सक्रीय झाला आहे. जय-पराजयासाठी त्याच्याकडून गावभर बोभाटा सुरू असून तो प्रत्येक उमेदवारांचा भाव ठरवत असल्याची खात्रीशीर माहिती आहे. पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावरच त्याचा हा खेळ सुरू असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे या सटोड्यावर अंकुश निर्माण करण्याचे मोठे आव्हान सध्या पोलीस प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!