सेवाग्राम रुग्णालयातील सोनोग्राफी सेंटरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग
साहसिक न्युज 24
प्रतिनिधी/ वर्धा:
वर्ध्यातील सेवाग्राम रुग्णालयातील सोनोग्राफी सेंटरमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. घटना दुपारच्या सुमारास घडली आहे. अचानक लागलेल्या आगीकडे सुरक्षा रक्षकांचे लक्ष गेले आणि त्वरित आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न झालाय. योगायोगाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधी नी रुग्णालयाचे गिरीश देव यांच्याशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला पण त्यांनी फोन उचलला नाही…