सोनेगाव स्टे. घाटावर पलटला रेतीचा ट्रॅक्टर: रेती मध्ये दबले मजूर दोन जागीच ठार एक गंभीर

0

सागर झोरे/ देवळी:

देवळी तालुक्यातील अडेगाव येथे आज सकाळी सात ते आठ वाजताच्या दरम्यान देवळी कडून सोनेगाव कडे जात असलेल्या ट्रॅक्टरचा हायड्रोलिक पट्टा तुटल्याने ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रॅक्टर ट्रालीसह पलटी झाला.
ट्रॅक्टर मध्ये बसून असलेल्या आठ ते दहा मजुरापैकी दोन मजूर जागीच ठार झाले तर बाकी गंभीर जखमी झाल्याने उपचाराकरिता सावंगी मेघे रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले.अनिल सुरेश लाकडे वय 33 वर्ष, ऋतिक दिनेश वानखेडे वय 24 दोन्ही रा. इंदिरा नगर देवळी असे मृतकांचे नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच देवळी पोलिसाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. हा ट्रॅक्टर देवळीतील माजी नागराध्यक्ष गौतम पोपटकर यांचा मालकीचा असल्याचे बोलल्या जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!