स्वच्छ सर्वेक्षण २०२१ वर्धा जिल्ह्यातून प्रथमच नगर पंचायत सेलू ला प्राप्त झाले स्वच्छ सिटी थ्री स्टार रँकिंग

0

सेलू / सागर राऊत

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केंद्र शासन द्वारा राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ चा निकाल दिनांक २० नोव्हेंबर २०२१ ला विज्ञान भवन नवी दिल्ली येथे जाहीर करण्यात आला. यामध्ये सेलू नगर पंचायत ला घवघवीत यश प्राप्त झाले, असून स्टार रँकिंग (कचरा मुक्त शहर) म्हणून सेलू शहराला थ्री स्टार घोषित करण्यात आले आहे. यात विशेष म्हणजे वर्धा जिल्ह्यातील सेलू हे २०२१ पासून सुरू असणाऱ्या या सर्व्हेक्षण प्रणाली अंतर्गत थ्री स्टार होणारे पहिले आणि एकमेव शहर ठरले आहे. आधी डेस्कटॉप असेसमेंट आणि नंतर केंद्रीय पथक द्वारा फिल्ड असेसमेंट म्हणजे प्रत्यक्ष पाहणी दरम्यान २५ परमान (पॅरामीटर) पूर्ण करणाऱ्या शहराला स्टार मानांकन प्राप्त होते. सेलू शहर हे आधीच ओडीफ प्लस (हागणदारी मुक्त) असून त्यात थ्री स्टार मानांकन सेलू शहराला प्राप्त झाल्याने शहराने स्वच्छ सर्वेक्षण मध्ये सहभागी ४३२० नगर परिषद,नगर पंचायत आणि महानगर पालिका रँकिंग मध्ये २१३ वे स्थान व झोनल रँकिंग ५७७ शहरा पैकी पैकी २६ वे स्थान प्राप्त केले आहे. सिटी रँकिंग मद्ये भारतातून पाचव्यांदा इंदोर हे शहर प्रथम ठरले तर स्टेट रँकिंग मध्ये महाराष्ट्र राज्याला दुसरे स्थान प्राप्त झाले आहे. त्या अनुषंगाने दिनांक २० नोव्हेंबर २०२१ ला स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या शहरी स्थानिक संस्था यांना विज्ञान भवन नवी दिल्ली येथे आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदिप सिंग पुरी व केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते. नगर पंचायत सेलूच्या वतीने विज्ञान भवन,नवी दिल्ली येथे सुरेश बगळे, प्रशासक नप सेलू तथा उपविभागीय अधिकारी वर्धा व धनंजय सरनाईक, मुख्याधिकारी नगर पंचायत सेलू यांनी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. हे यश प्राप्ती साठी धनंजय सरनाईक, मुख्याधिकारी नगर पंचायत सेलू यांनी सेलू शहरातील संपुर्ण नागरीकांचे व सेलू नगर पंचायत चे संपूर्ण स्वच्छ्ता कर्मचारी स्टाफ तसेच नगर पंचायत सेलू चे संपूर्ण अधिकारी कर्मचारी यांचे आभार व्यक्त करून अभिनंदन केले आहे. सोबतच स्वच्छ्ता अभियान राबविताना वेळोवेळी सहकार्य करणारे सेलू येथील दीपचंद चौधरी विद्यालय, विद्याभारती महाविद्यालय, सूर्यधरम स्पोर्ट्स क्लब सेलू व शौर्य स्पोर्ट्स अकॅडमी सेलू चे सुद्धा आभार व्यक्त केले व सेलू शहरातील नागरिकांना शहर पुढेही असेच स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी सहकार्यासाठी विनंती केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!