स्वर्गीय प्रमोद महाजन स्किल डेव्हलपमेंटच्या नावावर सहाय्यक आयुक्त हरडे व नितीन रामचंद्र कोचे यांनी केला कोट्यावधी रूपयांचा आर्थिक घोटाळा

0

टी.बी.एन. आणि व्ही.टी.पी.आय. बँकेचे प्रशिक्षण न घेताच कोट्यावधी रुपयांचे अनुदान संस्थाचालक नितीन कोचे यांनी केले हडप

नागपूर येथे राहणाऱ्या नितीन कोचे याने यवतमाळ येथे आपली दुकानदारी टाकून या ठिकाणी केला कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा

कॅफे चालक नितीन कोचे अल्पावधीत बनला कोट्याधीश

माजी गृहमंत्री अनिल देशमुख माझ्या जवळचे असल्याची बतावणी करून नितीन कोचे यांनी शासकीय बदली करण्यासाठी घेतले लाखो रुपये

ज्याप्रमाणे अनिल देशमुख जेलमध्ये गेले त्याचप्रमाणे नितीन कोचे याला जेलची हवा खाण्याची आली वेळ

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर सहाय्यक आयुक्त प.ग. हरडे यांनी नितीन कोचे यांच्याशी हातमिळवणी करून केली कोट्यावधी रुपयांची लूट

वर्धा शहर प्रतिनिधी/

नागपूर येथील नितीन रामचंद्र कोचे राहणार लोकमान्य सोसायटी जगन्नाथ नगर बेसा याने स्वर्गीय प्रमोद महाजन स्किल डेव्हलपमेंट अधिकारी यांच्याशी संगनमत करून यवतमाळ शहरात स्वर्गीय प्रमोद महाजन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूरच्या वतीने वोकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट उपलब्ध करून देऊन काही व्यक्तीकडून दोन लाख रुपये घेतले तर यवतमाळ शहरात आपले संस्थेचे नाव आणि नितीन कोचे यांनी आपली दुकानदारी थाटून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण न देताच कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले आहे. या बाबीची गंभीर तक्रारी झाल्यानंतर सुद्धा नितीन कोचे सोबत हात मिळवणी करून हा आर्थिक घोटाळा केल्याची बाब उघड झाली आहे. किमान कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय योजना २०१६ ते २०१८ या आर्थिक वर्षात एकूण ५० लाख रुपये इतकी रक्कम नियमबाह्य मंजूर करण्यात आले होते. सदर रक्कम अंमलबजावणी करणारे यंत्रणेचे बीडीएस प्रणालीवर नियमाप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आली होती त्या अनुषंगाने उमेदवारांना प्रशिक्षण देणाऱ्या केंद्रांना यापूर्वी ५० लाखाचे प्रथम ३० टक्के नियमाचे अधीन राहून अदा करण्यात आले असून संपूर्ण रक्कम सन २०१७ ते २०१८  मध्ये पूर्ण खर्ची करण्यात आली आहे. कोणतेही प्रशिक्षण न देता सद्या संपूर्ण विदर्भात भाजपा निकटच्या कार्यकर्त्यांनी संस्था स्थापन करून स्वर्गीय प्रमोद महाजन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली आहे. कोणत्या संस्थेत किती विद्यार्थी संख्या होती तो विद्यार्थी सदर संस्थेत प्रशिक्षण घेत होता का ? शिक्षकांना वेतन दिले का? किती विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून दिला ? या सर्व बाबींची चौकशी करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. केंद्र शासनाच्या निधीचा दुरुपयोग होत असून हा सर्व निधी जिल्हा नियोजन अधिकारी यांच्यामार्फत वितरित करण्यात येत असताना तेव्हा या गंभीर भ्रष्टाचार प्रकरणाकडे जिल्हाधिकारी वर्धा, यवतमाळ, नागपूर यांनी या भ्रष्ट कारभाराची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!