स्व. प्रमोद महाजन स्किल डेव्हलपमेंट चे अनुदान उचलण्यासाठी नितीन कोचे नावाच्या भामट्याने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता अधिकार्याचे बनावट कागदपतत्रे केले तयार, यवतमाळ शहर पोलिसात गुन्हा दाखल.
प्रतिनिधी/वर्धा:
नागपूर येथील रहिवासी नितीन रामचंद्र कोचे रा. लोकमान्य सोसायटी जगन्नाथ नगर, बेसा यांनी स्व. प्रमोद महाजन स्किल डेव्हलपमेंट जिल्हा कार्यालय यवतमाळ यांना बनावट कागदपत्रे सादर करून लाखो रुपयांचे अनुदान लाटल्याची बाबा दै. साहसिक मध्ये दि. 21 नोव्हेंबर 2021 रोजी वृत्त प्रकाशित होताच उघडकीस आली.
दै. साहसीक संपादक यांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर, सहाय्यक आयुक्त
श्री. प्र.ग. हरडे यांच्या मोबाईल क्रमांक वर संपर्क साधला असता त्यांनी दै. साहसिकला सांगितले की, नितीन रामचंद्र कोचे यांने यवतमाळ येथे एन.के. इन्स्टिट्यूट नावानी प्रशिक्षण केंद्र उघडून या ठिकाणी स्व. प्रमोद महाजन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र स्थापन करून या ठिकाणी
टी.बी.एन आणि व्ही.टी.पी.आय प्रशिक्षण देण्यासाठी कार्यालय, प्रशिक्षित शिक्षक वर्ग, प्रशिक्षण देण्याचे साहित्य उपलब्ध नसताना अन्य संस्थेच्या तपासणी अहवाल जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर, सहाय्यक आयुक्त नागपूर यांच्या कार्यालयातून चोरून नेला. आणि स्वतःचे एन. के. इन्स्टिट्यूटचे नाव टाकून त्यांची कॉफी करून शासनाला सादर केला. कोणतेही कार्यालय किरायाने न घेता या भामट्यांने लाखो रुपयांची उचल बनावट कागदपत्रे तयार केली. ही बाब जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर येथील अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच संबंधित कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी यवतमाळ येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता नितीन कोचे या भामट्याने शासनाला सादर केलेले कागदपत्र हे बनावट सही चे असल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाले. यामुळे नितीन रामचंद्र कोचे या भांमट्या विरोधात यवतमाळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला व यामध्ये आरोपीला अटक सुद्धा करण्यात आली. शासनासोबत धोका दिल्यामुळे या भामट्यानी स्थापन केलेली एन.के. इन्स्टिटयूट संस्था ही शासनाने काळया यादीत टाकली. यामुळे या भामट्याने पुन्हा शासनाला फसविण्यासाठी व्होकेशनल ट्रेनिंग प्रोव्हायडर वेल्फेअर असोसिएशन नागपुर, 349/2 कस्तुरबा गांधी भवन, बजाज नगर, नागपुर (महाराष्ट्र) या नावानी संस्था उघडली. यामध्ये अध्यक्ष म्हणून सुधाकर आखरे, सचिव निलेश बोपचे, उपाध्यक्ष म्हणून बाळकृष्ण जेठे, सहसचिव नितीन कोचे, कोषाध्यक्ष विशाल मुळे, सदस्य राहुल पठाळे, सदस्या ज्योती सोनिग्रा यांचा समावेश असून या संस्थेच्या मार्फत शासनाला कोटी रुपयांचा आर्थिक सुना लावण्यासाठी किशोरी शक्ती (योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण) या केंद्र सरकार पुरस्कृत योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांमध्ये 11 ते 14 वयोगटातील मुलींना (एम एस) अंतर्गत होकेशनल ट्रेनिंग प्रोव्हायडर मार्फत प्रशिक्षण देण्याचा उपक्रम नितीन कोचे या भामट्याने हाती घेतला आहे.