हिंगणघाटात देशीकट्टे विकणार्या दोघांना अटक ; मात्र, देशीकट्टे एक होते की दोन…?
साहसिक न्युज24
प्रतिनिधी / हिंगणघाट:
गावठी बनावटीचा देशी कट्टा विक्रीसाठी शहरात येणार्या दोघांना स्थानिक नांदगाव चौकात हिंगणघाट पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 15 हजार रुपये किंमतीच्या देशी कट्ट्यासह दुचाकी असा 39 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही घटना आज 19 रोजी दुपारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे प्रगटीकरण पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव चौकात छापा टाकून घाटसावली येथील सोनु सोनटक्के तसेच शहरातील शास्त्री वार्ड येथील सूरज करपे (23) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची तपासणी केली असता सोनूकडून 8 एम.एम. लोखंडी बॅरल असलेला देशी कट्टा तसेच चोरी केलेली दुचाकी आढळून आली. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक वसंत शुक्ला हे करीत आहेत. ही कारवाई उप विभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम, ठाणेदार के. एम. पुंडकर यांचे निर्देशानुसार पोलिस उप निरीक्षक वसंत शुक्ला यांच्यासह गुन्हे प्रगटीकरण पथकाचे विवेक बनसोड, पंकज घोडे, प्रशांत वाटखेडे, उमेश बेले, आशिष गेडाम यांनी केली.
कट्टे दोन की एक
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी छापा टाकून शहरात विक्रीसाठी येत असलेला देशीकट्टा व दुचाकी जप्त केली. यात दोघांना अटकही करण्यात आली. मात्र, देशीकट्टे एक होते की दोन या विषयाची शहरात दिवसभर चर्चा रंगली होती.