हिंगणघाट येथील मेडिकल कॉलेजच्या जागेसंबंधी जिल्हाधिकारी यांना दिले माहिती.
उपजिल्हा रुग्णालयाला लागुन ७७ एकर जागा शासनाकडे उपलब्ध.
मेडिकल कॉलेज ह्याच जागेवर झाले तर शासनाचे वाचेल १५० कोटी रुपये.
हिंगणघाट : येथे मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयच्या जागेसंबंधी आराखडा विषया वरती विचारणा करून चर्चा दिनांक ०६ फेब्रुवारी २०२४ ला माजी आमदार प्रा.राजु तिमांडे, माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे, शासकीय मेडिकल कॉलेज संघर्ष समीतीचे अध्यक्ष सुनिल पिंपळकर,समीतीचे सचिव सुरेंद्र टेंभुर्णे यांनी जिल्हा अधिकारी राहुल कर्डिले यांना शासकीय मेडिकल कॉलेजच्या जागे समंधी माहिती देवून निवेदन दिले.
हे शासकीय मेडिकल कॉलेज उपजिल्हा रुग्णालय इथेच व्हावे असे चर्चे दरम्यान सांगण्यात आले कारण उपजिल्हा रुग्णालयाला लागुणच ३७ ऐकर व माडा काॅटरला लागुणच ४० ऐकर अशी ऐकुन ७७ ऐकर जमीन शासनाकडे उपलब्ध आहे.जर हे मेडिकल कॉलेज ह्याच जागेवर झाल तर शासनाचे १५० करोड रुपये वाचेल आणि हि जागा हिंगणघाट शहराच्या मध्यभागी असुन इथुन अर्धा किलो मीटर वर रेल्वे स्टेशन,अर्धा किलोमीटर वर बस स्टाॅप आणि अर्धा किलोमीटर वर पावर स्टेशन, मार्केट लाईन,अति आवश्यक सर्व वस्तूचे दुकान जवळ आहे तसेच नॅशनल हायवे ४४ सुध्दा ह्या रुग्णालयला लागुन असुन वणा नदीच मुबलक पाणी उपलब्द आहे.
माजी आमदार प्रा.राजु तिमांडे,माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे, समीतीचे अध्यक्ष सुनिल पिंपळकर,सचिव सुरेंद्र टेंभुर्णे यांनी जिल्हाधिकार्यांना हे सर्व पटवुन सांगितले की जेंव्हा केंद्र शासनाकडून मेडिकल कॉलेजच्या जागेची पाहणी करण्याकरिता टिम येईल तेंव्हा आम्हा सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावे यावे असे सुचविले.