हिंगणघाट कारसह चार लाख पाचशे रुपयाचा दारूसाठा जप्त

0

इक्बाल पहेलवान / हिंगणघाट :

तालुक्यातील मौजा चिंचोली शिवारात देशी दारूच्या सुमारे
1008 बाटल्या अवैध वाहतुक करतांना पोलिसांनी एका कारवाईत जप्त केल्या असून या प्रकरणी हिंगणघाट येथील संत कबिर वार्ड रहिवासी प्रतिक राजु पंचभाई,गुलशन पौनीकर तसेच येनोरा येथील राजपाल फुलझेले यांचेसह एका विधी संघर्षीत बालकास ताब्यात घेण्यात आले.
आरोपीं कडून एकुण 1,00,800 रुपये किमतीची देशी दारू तसेच दारुची अवैध वाहतुक करण्यासाठी वापरलेली पांढन्या रंगाची कार क्र. MH-02/CR-3010 तसेच एक जुना अॅन्ड्रॉईड मोबाईल असा एकूण 4 लाख 5 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल हिंगणघाट पोलिसांच्या पथकाने जप्त केला. व आरोपी विरुद्ध कलम 7 (अ), 83 म.दा.का. सहकलम 3(1), 18, 720/177 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार संपत चव्हाण, हवालदार कैलास दाते, रवी वानखेडे, समीर गावंडे, लोहकरे, आशिष मेश्राम, आकाश कांबळे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!