हिंगणघाट पोलिसांनी हरवलेल्या इसमाचा मोबाईल व पैशांचा शोध घेऊन केले परत….

0

हिंगणघाट -/ 18 मे रोजी कुणाल सातारकर रा. सुलतानपूर यांनी 112 मदत केंद्रावर फोन करून हिंगणघाट पोलिसांना माहिती दिली की , ते हिंगणघाट वरून सुलतानपूर गावाकडे मोटर सायकल ने परत जात असता त्यांचा मोबाईल कुठेतरी पडला आहे व मोबाईल च्या कव्हर मागे तीन हजार रुपये रोख आहे… अशी माहिती मिळताच हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे 112 पथकात काम करत असलेले पोलीस हवालदार प्रवीण बोधाने, पोलीस शिपाई संदीप उईके यांनी सायबर सेल वर्धा येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार अनुप कावळे यांच्या मदतीने हरवलेल्या इसमाचा मोबाईलचे लोकेशन काढून मोबाईल लोकेशनचा आधारे मोबाईलचा शोध घेऊन कुणाल सातारकर यांना पोलीस स्टेशनला बोलाऊन हरवलेला मोबाईल व तीन हजार रुपये रोख रक्कम त्यांना परत केले.कुणाल सातारकर यांनी त्यांचा मोबाईल व पैसे परत मिळतात पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील ठाणेदार प्रवीण मुंडे, पोलीस हवालदार प्रवीण बोधाने, पोलीस शिपाई, संदीप उईके, महेंद्र गायकवाड, भूषण भोईर यांचे आभार मानले…..

ईकबाल पहेलवान साहसिक news -/24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!