हिंगणघाट प्रकरणात गुन्हा सिद्ध: उद्या सुनावणार न्यायालय शिक्षा

0

इक्बाल पहेलवान / हिंगणघाट :

बहुचर्चित प्रा. अंकिता जळीतकांड प्रकरणी स्थानिक जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्यावतीने आज गुन्हा सिद्ध झाल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे.याप्रकरणी उद्या न्यायालयाकडून शिक्षा सुनावली जाणार असल्याची माहिती एडवोकेट उज्वल निकम यांनी दिली.
आज ११.३५ वाजताचे दरम्यान जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.भागवत यांनी खटल्याचे जवळपास दुपारी१२.५ वाजताच आज खटल्याचे कामकाज संपले. सरकारी वकील उज्वल निकम,स्थानिक शासकीयअधिवक्ता दिपक वैद्य,बचाव पक्षाचे वकील भूपेंद्र सोने ईत्यादिनी न्यायालयीन कामकाजात भाग घेतला.
प्रा.अंकिता खटल्याचा
संपूर्ण २८ दिवस तपास केल्यानंतर सरकार पक्षाचेवतीने सदर प्रकरणात एकूण ४२६ पानाचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते,तब्बल २ वर्षे जलदगती न्यायालयात या प्रकरणाची सुनावनी करण्यात आली.
विक्की उर्फ विकेश नगराळे या विवाहित नराधमाने एकतरफा प्रेमातून या अविवाहित प्राध्यापिकेस पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता,यातच या प्राध्यापीकेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यु झाला होता.
आज या खटल्याचा निकाल अपेक्षित असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता,यावेळी प्रसिद्धि माध्यमाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते,
पीडिता अंकिता हिचे आईवडीलांनी न्यायालयीन प्रक्रियेवर संपूर्ण विश्वास असल्याचे सांगत आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली.
या खटल्याच्या निकालासाठी आज ९ फेब्रुवारी ही तारीख ठरविण्यात आली असल्याने नागरिकांनीसुद्धा न्यायालय परिसरात मोठी गर्दी केली होती.
सदर खटल्यात आज गुन्हा सिद्ध करण्यात आला असून आरोपीला उद्या शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
न्यायाल्याने आम्ही केलेला युक्तिवाद तसेच पुरावे विचारात न घेतल्यामुळे आरोपीच्यावतीने उच्च न्यायालयाचे नागपुर खंडपिठात दाद मागणार असल्याची माहिती बचाव पक्षाचे वकील भूपेंद्र सोने यांनी दिली.
खटल्याचे कामकाजादरम्यान पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर यांचेसह उपविभागिय पोलिस अधिकारी दिनेश कदम,ठाणेदार संपत चव्हाण न्यायालयीन परिसरात हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!