हिंगणघाट मुस्लिम प्रीमियर लीग सिझन -1 फ्रेंचायझी क्रिकेट स्पर्धेचा समारोप…

0

हिंगणघाट : येथील पॅसिफिक क्रिकेट ग्राउंड बसंत विहार येथे 1 ते 4 फेब्रुवारी 2024 दरम्यान मुस्लिम प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.मुस्लिम खेळाडूंची ही पहिलीच स्पर्धा होती ज्यात फक्त मुस्लिम खेळाडू खेळले होते, मुस्लीम तरुणांना एका व्यासपीठावर आणणे, त्यांच्यातील कलागुणांना वाव देणे आणि खेळाच्या माध्यमातून त्यांचा शारीरिक विकास करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजन समितीने सांगितले.या स्पर्धेत एकूण सहा संघ मालकांनी लिलाव प्रक्रियेतून हिंगणघाट येथील मुस्लिम खेळाडूंची निवड करून संघ तयार केले होते.ज्यामध्ये फॅशन पॉइंट रायडर्स, हॅलो हीटर्स, खान फायटर्स, इमरान प्रिन्स इलेव्हन, मुजीब ज्वेलर्स, थंडर स्ट्रायकर संघ सहभागी झाले होते.या स्पर्धेत दोन गटात सामने झाले, त्यापैकी इमरान प्रिन्स इलेव्हन, मुजीब ज्वेलर्स, हॅलो हीटर्स आणि थंडर स्ट्रायकर्स या संघांनी उपांत्य फेरी गाठली.4 फेब्रुवारी रोजी दुपारी उपांत्य फेरीचे सामने झाले, त्यापैकी इमरान प्रिन्स इलेव्हन आणि थंडर स्ट्रायकर संघांनी अंतिम फेरी गाठली.रात्री 8 वाजता अंतिम सामना सुरु झाला, अंतिम सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.असा कार्यक्रम प्रेक्षकांनी पहिल्यांदाच पाहिला आणि प्रेक्षकांचा उत्साह पाहण्यासारखा होता.अंतिम सामन्यात थंडर स्ट्रायकरने प्रथम फलंदाजी करत 12 षटकात 171 धावांची मोठी धावसंख्या उभारली, याला प्रत्युत्तर म्हणून इमरान प्रिन्सने फलंदाजी करत संपूर्ण संघ 10 षटकात अवघ्या 120 धावांत सर्वबाद झाला.थंडर स्ट्रायकरचा आयकॉन खेळाडू आबिद शेख अंतिम फेरीत सामनावीर घोषित तर सर्वोत्कृष्ट गोलंदाज रेहान कुरेशी, सर्वोत्कृष्ट फलंदाज मोहम्मद अजानी, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक अब्दुल कदीर बख्श आणि मालिकावीर अबिद शेख ठरले.पुरस्कार वितरण समारंभाला उपस्थित पाहुण्यांमध्ये गिमाटेक्सचे चेअरमन प्रशांत बाबू मोहता, कारखाना व्यवस्थापक शाकीर खान पठाण, प्रवीण फटिंग कारखाना व्यवस्थापक गिरधर सर, सैफुद्दीन हुसेन, सैफुद्दीन सैफी, इब्राहिम बख्श आझाद, इरफान खान, एचटी न्यूजचे सीईओ मंगेश लोखंडे. पत्रकार मोहम्मद.रफिक, सय्यद जाकीर अली, फिरोज खान, डॉ.सलीम, मिर्झा दौलत बेग, जावेद मिर्झा, ऍड अर्शी आजमी, फारीश अली सर, आदिल आजमी, डॉ सलीम बख्श आदी मान्यवर उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांनी सर्व खेळाडूंना पारितोषिके देऊन विजेत्या व उपविजेत्या संघांचे चषक व पारितोषिक देऊन अभिनंदन केले.आयोजन समितीमध्ये ज़हीर अहमद, शाहिद रज़ा, मुस्तफा बक्श, अब्दुल कदीर बक्श, करीम खान, सादिक खान, इमरान शेख, ॲड मुबारक मलनस, मुफ्ज्जल हुसेन, करीम खान, जमीर शेख जम्मू, नूर शेख, साकिब शेख, अशरफ मलनस यांनी अथक परिश्रम केले.

ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज/24 हिंगणघाट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!