हिंगणघाट येथे ओबीसी जागर यात्रेला उस्फूर्त प्रतिसाद.
हिंगणघाट : २ ऑक्टोंबर रोजी नांदगाव चौरस्ता येथे जंगी स्वागत शहरातील मुख्य मार्गावरून भव्य बाईक रॅली भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्षआमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे नेतृत्वात पारडी (नगाजी)येथून प्रारंभ झालेल्या ओबीसी जनजागरण यात्रेला हिंगणघाट येथे उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारडी( नगाजी) येथून निघालेल्या यात्रेचे दुपारी ठीक अडीच वाजता नांदगाव चौकात आगमन झाले. यावेळी भाजयुमो चे प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकूर व युवा मोर्चा च्या पदाधिकाऱ्यांचे वतीने भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी आ. चंद्रशेखर बावनकुळे, खासदार संगमलाल गुप्ता , आ. समीर कुणावार, माजी आमदार आशीष देशमुख ,भाजपा वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील गफाड यांचे क्रेन द्वारे तीस फूट लांबीच्या हार अर्पण करून मान्यवरांचे सामूहिक स्वागत करण्यात आले. यानंतर शहरातील मुख्य मार्गावरून बाईक रॅली चे भव्य आयोजन करण्यात आले.यात मोठ्या संख्येनी महिला वर्ग सुद्धा सहभागी होता . यावेळी स्वतः आ. बावनकुळे व आ. कुणावार यांनी बाईक वर स्वार होऊन रॅलीत सहभागी झाले. स्थानिक कारंजा चौकातील गांधी पुतळ्याला माल्यारपण करून विठोबा चौक , नंदोरी चौक मार्गे निखाडे भवन येथे पोहचला. निखाडे भावणात आयोजित कार्यक्रमाला व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर,आ. बावनकुळे , खासदार रामदास तडस , विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, आमदार समीर कुणावार, आमदार डॉ रामदास आंबटकर, माजी आमदार आशीष देशमुख , खासदार गुप्ता , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे,डॉ उषाकिरण थुटे , भाजप शहराध्यक्ष भूषण पिसे,अनिता माळवे , अर्चना वानखेडे आदीची उपस्थिती होती. यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांचे भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, बूथ प्रमुख , शक्ती केंद्र प्रमुख व कार्यकर्त्यांचे वतीने स्वागत व सत्कार करण्यात आले. याप्रसंगी आ. बावनकुळे यांचे हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, सुवर्ण व्यावसायिक सुभाष निनावे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपा मध्ये प्रवेश घेतला. यावेळी बोलताना आमदार कुणावार म्हणाले की ओबीसी आरक्षणाबाबत विरोधी पक्षाचे वतीने दिशाभूल करण्याचे काम सुरू असून यापासून सावध राहण्याची गरज असल्याचे सांगितले. खासदार तडस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभा विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देऊन नवा इतिहास घडविल्या चे सांगितले. खासदार गुप्ता यांनी काँग्रेस पक्षाने ओबीसींची उपेक्षाच केल्याचे सांगितले. ओबीसी जागर यात्रेचे संयोजक चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की या यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या वतीने ओबीसी करीता राबविल्या जात असलेल्या योजनाची माहिती देण्याचा मुख्य उद्देश असल्याचे सांगून विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना ३३ टक्के आरक्षण देऊन महिला सशक्तीकरनाचे मोठे पाऊल उचलले आहे. ही महिला वर्गाकरिता निश्चितच अभिमानाची बाब आहे.ओबीसी मंत्रालयाची स्थापना महाराष्ट्रात भाजप सरकारने सर्वप्रथम केल्याचे सांगितले. विरोधकांकडे काहीच मुद्धे शिल्लक नसल्याचे ओबीसी बाबत संभ्रम पसरवण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सरतेशेवटी सांगितले. प्रास्ताविकासह संचालन किशोर दिघे यांनी केले. उपस्थितांचे आभार सुनील गफाड यांनी मानले
कार्यक्रमाचे आयोजनाकरिता अंकुश ठाकुर, आकाश पोहाणे, वामन चंदनखेडे, संजय डेहने, विनोद विटाळे,गजानन राऊत,प्रफुल बाडे ,भूषण पिसे, प्रा किरण वैद्य, योगेश वानखेडे,विकास इंगळे, मंगेश राऊत,सोनू गवळी,रवी उपासे, सुनील राऊत,कैलास टिपले,विठू बेनिवार, नितीन वाघ, योगेश बोंडे,अनिल बोंडे,सोनू पांडे, कवी इंगोले, राकेश शर्मा, अनिल गाहेरवार ,योगेश फुसे , रामकृष्ण इंगोले आदींनी सहकार्य केले.आमदार समीर कुणावार यांनी मांडली सोयाबीन उत्पादकांची व्यथा आपल्या भाषणातून आमदार समीर कुणावर यांनी सोयाबीन उत्पादकांची व्यथा मांडली. ते म्हणाले की पिवळ्या रोगामुळे८० टक्के उत्पादन शेतकऱ्यांच्या हातून गेलेले आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांची परिस्थिती अत्यांत वाईट आहे .त्यांना तातडीने मदत देण्याची गरज आहे. तरी शासनाने सोयाबीन उत्पादकांचे पिकांचे नुकसानीचे सर्वेक्षण करून लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी यावेळी केली.
ईकबाल पहेलवान सहासिक न्यूज -24