हिंगणघाट विधानसभे करीता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवारी करिता माजी नगरपालिका अध्यक्ष पंढरी कापसेंसह प्रविण उपासेंचीही दावेदारी…

0

वर्धा येथील सद्भावना भवनात काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारी अर्जं सादर.

हिंगणघाट -/ आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकी संदर्भात हिंगणघाट , सिंदी(रेल्वे), समुद्रपूर विधानसभा क्षेत्रातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी याकरीता हिंगणघाट विधानसभा काँग्रेसचे शहराध्यक्ष तसेच माजी नगराध्यक्ष पंढरीनाथ कापसे यांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल करीत दावेदारी सादर केली आहे.
याचवेळी काँग्रेसचे विधानसभा प्रभारी प्रवीण उपासे यांनीसुद्धा वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीकडे वर्ध्यातील सद्भावना भवन येथील कार्यालयात जावून अर्ज सादर केले. यावेळी त्यांचे सोबत काँग्रेस पक्षाचे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.
सदर अर्ज सादर करतांना वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव विजय नरांजे यांनी दोघांचेही अर्ज स्वीकारले.
याप्रसंगी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्वलंत मुन, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अमित चाफले , काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी डॉ. रामकृष्ण खुजे, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते शालिकरावजी डेहने, सिंदी(रेल्वे)काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाशचन्द्र डफ, वर्धा जिल्हा सोशल मीडिया प्रभारी नरेंद्र चाफले, समुद्रपूर तालुका अध्यक्ष गुणवंतराव कोठेकर, महिला जिल्हा उपाध्यक्षा रागिनिताई शेंडे, पुरुषोत्तम भगत, हिंगणघाट शहर उपाध्यक्ष गुणवंतराव कारवटकर, माजी जिल्हा सचिव सुरेंद्र बोरकर,आरंभा येथील सरपंच ईश्वर सुपारे, सुनील हरबुडे, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष कदिर मामु, प्रकाशराव निखाडे, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते पी. ए. मून, डॉ. जी. एम. दुधे, हनुमान भाजीपाले, रमेश ढाले, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष इकबाल पहेलवान, पवन कटारे, सुजाता जीवनकर, सुनीता गुजरकर, सुनीता तलवेकर, मंदाकिनी ढाले, इत्यादी काँग्रेसचे हिंगणघाट विधानसभेतील पदाधिकारी उपस्थीत होते.

ईकबाल पहेलवान साहसिक news -24,हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!