१४ नोंव्हेबर रोजी मोहनबाबु अग्रवाल महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित होणार
प्रतिनिधी / वर्धा :
जयहिंद सेवाभावी शिक्षण संस्था परभणी द्वारा आयोजित महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्काराने वर्धा जिल्ह्याचे सुप्रसिद्ध समाजसेवी व उद्योजक मोहनबाबु अग्रवाल दिनांक १४ नोव्हेंबर रविवारी सांयकाळी ६ वाजता दादाजी धुनिवाले सभागृहात महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून खासदार रामदास तडस तर अध्यक्ष म्हणून पंजाब हरीयाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती जस्टीस अरूण बी. चौधरी तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता विजय गाखरे, नगराध्यक्ष अतुल तराळे, गोसीखुर्द प्रकल्पाचे माजी मुख्य अभियंता, जे.एम. शेख विदर्भ विकास महामंडळाचे माजी सहाय्यक संचालक प्रकाश डायरे, जयहिंद शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अब्दुल सत्तार इनामदार प्रदेश अध्यक्ष व पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष इंजि. आर. डी मगर, विख्यात हृदयरोगतज्ञ व न्यू इरा होस्पीटलचे संचालक डॉ. आनंद संचेती, कुही येथील ठाणेदार चंद्रकांत मदने, ओ.पी. नय्यर फॅन्स क्लॅबचे संस्थापक सदस्य ॲड विजयसिंह ठाकुर, बुलढाण अर्बन को. ऑ. सोसायटी नागपुरचे विभागीय व्यवस्थापक विनय राजे, जयहिंद सेवाभावी शिक्षण संस्थेचे माजी प्रदेश अध्यक्ष इमरान राही, प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. सुत्रसंचालन ॲड इब्राहीम बख्श आजाद व विलास कुळकर्णी करणार आहे.
कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन खदीरलाला हाश्मी सरदार खान, संजय जयस्वाल, आर. एस. लभाणे व अन्य पदाधिकारीनी केले आहे.