२६/ ११ च्या हल्ल्यात शहिदांच्या स्मृतीस अभिवादन

प्रतिनिधी / सालेकसा
२६/ ११ मुंबई येथील झालेल्या भ्याड हल्ल्यात हुतात्मा झालेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी तसेच मुंबई येथील नागरिकांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी सालेकसा मित्र परिवारातर्फे सालेकसा बस स्थानक येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रामुख्याने सालेकसा पोलीस स्टेशनचे ठाणेदार अरविंद राऊत सालेकसा नगरपंचायत चे बांधकाम सभापती उमेदलाल जैतवार, मनसे तालुका अध्यक्ष ब्रजभूषण बैस, भाजप युवा मोर्चा महामंत्री आदित्य शर्मा, मनसे शहर अध्यक्ष राहुल हटवार, मधुकर हरिनखेडे, साई बंडीवार, विनोद मडावी,अनिल तिरपुडे, गोल्डी भाटिया, निखिल मेश्राम, राजेश डोये, भौतिक हरिनखेडे, कमलेश साठवणे, रमेश अग्रवाल, सुजित बन्सोड, राजेश भास्कर, राजेंद्र भसमोटे, मयूर पाथोडे व इतर गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.