३४ वार करुन दारुविक्रेत्या ‘मनोज’ची निघून हत्या जुन्यावादाचा काढला वचपा : गोंडप्लॉट परिसरात मध्यरात्री थरार

0

क्राईम प्रतिनिधी / वर्धा :

जुन्या वैमनस्यातून दारुविक्रेत्याची धारदार शस्त्राने सपासप वार करीत क्रुररित्या हत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी मध्यरात्री ११.३० वाजताच्या सुमारास शहरातील गोंडप्लॉट परिसरात घडली. या घटनेने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी शहर पोलिसांनी एकास अटक केली असून इतर चार आरोपींचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली. मनोज मुकुंद धानोरकर (३२) रा. केळकरवाडी असे मृत दारुविक्रेत्याचे नाव आहे.
मृतक मनोज धानोरकर याने घराच्या अवघ्या काही अंतरावर भाड्याने खोली घेतली होती. त्या खाेलीतून तो दारुविक्रीचा व्यवसाय सुरू होता. शनिवारी रात्रीच्या सुमारास मनोजच्या पत्नीने त्याला भ्रमणध्वनी करुन जेवण करण्यास येण्यासाठी सांगितले. त्यावेळी मनोजचा कुणाशीतरी वाद सुरु असल्याने त्याचा आवाज मनोजच्या पत्नीला फोनवर ऐकू आला. मनोजच्या पत्नीने तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली असता मनोज रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडल असल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मनोजला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. तेथून त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी मनोजची पत्नी कोमल धानोरकर हिने शहर पोलिसात ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी आकाश जयस्वाल याला अटक करुन उर्वरित पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप, ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी भेट दिली. तसेच पोलीस उपनिरीक्षक मोहन धोंगडे, नरेंद्र कांबळे, यांच्यासह शोध पथकाने तपास सुरु केला. घटनास्थळी श्वान पथक, ठसे तज्ज्ञांनाही बोलाण्यात आले होते.

मृतक आरोपी दोघेही दारुविक्रेते

मृत मनोज धानोरकर आणि आरोपी आकाश जयस्वाल यांच्यात जुना वाद होता. ऑक्टोबर २०२० मध्ये मृतक मनोजने आकाश जयस्वाल याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!