अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या उन्हाळी सुट्या बुडणार नाहीत – आयुक्त रुबल अग्रवाल
साहसिक न्यूज 24
प्रतीनिधी / वर्धा :
आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे , उपाध्यक्ष काँ श्याम काळे व काँ मधु कदम यांच्या शिष्टमंडळाने एकात्मीक बाल विकास सेवा योजना आयुक्त मा.रुबल अग्रवाल यांची भेट घेवून
विविध मागण्याचे निवेदन देवून विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या उन्हाळी सुट्या बुडणार नाही असे आश्वासन दिले.
तेपुढे म्हणाल्या कोरोणामुळे मागील वर्षातील शिल्लक सुट्या आणी या वर्षातील शिल्लक सुट्या दिवाळीत देण्यात येईल , अनेक जिल्हात तापमान वाढत असल्यामुळे अंगणवाडीत मुले बोलावू नये अशी मागणी आयटकने केली. उष्ण तापमानामुळे मुलांनवर परिणाम झाल्यास आयुक्त कार्यालय जबाबदारी घेईल का? अशा प्रश्न निवेदनात उल्लेख केल्याने आयुक्त यांनी नाराजी व्यक्त केली याबाबत आयुक्त यांनी ज्या जिल्ह्यात उष्णता जास्त अशी परिस्थिती आहे अशा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी परिस्थितीचा आढावा घेवून निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचा आहे, तसेच काही केंद्रात फक्त सेविका मदतनिस मिनी अंगणवाडी सेविका एकटीच आहे अशा वेळी स्थानिक पातळीवर सुट्या काळातील चार्ज इतरांना देवून सुट्या देण्याबाबत निर्णय घ्यावा.
मागील दोन वर्षात कोरोणाचा प्रादुर्भाव असल्यामुळे उन्हाळी सुट्या देवू नये असे शासनाचे आदेश असल्याने व आता कोरोणाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने उन्हाळी सुट्या देण्यात येत आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी या संकटाला तोंड देण्यासाठी केलेले कार्य समाधानकारक आहे असेही आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले
यापुर्वी संघटनाच्या कृती समिती पदाधिकारी सोबत झालेल्या चर्चा नुसार सर्व प्रस्ताव सचिव महिला बालविकास यांच्या कडे पाठविण्यात आले आहे .लवकरच शासन निर्णय निर्गमीत होतील अशी अपेक्षा व्यक्त केली
पर्यवेक्षीकाच्या रिक्त जागा अंगणवाडी सेविकां मधून भरण्यासाठी जिल्हा परिषदाना ग्रामविकास विभागा मार्फत सुचना देण्यात आल्या आहेत भंडारा जिल्ह्यातील साकोली प्रकल्पात २०२० ची भाऊबीज देण्या बाबत तर यवतमाळ येथिल यवतमाळ येथील पदोन्नती संदर्भात .इत्यादी प्रश्नावर सविस्तर चर्चा आयुक्त यांनी केल्या बद्दल आयटक संघटनेच्या वतिने आभार व्यक्त करण्यात आले.
मार्च एप्रिल थकीत मानधना बाबत चर्चा झाली.
झालेल्या बैठकीत अंगणवाडी उपायुक्त विजय क्षीरसागर वित्त लेखा अधिकारी दत्ताञय लोंढे खंडागडे यांची उपस्थिती होती.