अखेर चार महिन्यानंतर रविनाचा सर्पदंशाने मृत्यू
साहसिक न्युज24
देवळी/ सागर झोरे :
देवळी तालुक्यातील टाकळी खोडे येथील अखेर चार महिन्यानंतर सर्पदंश होऊन मृत्यू झाल्याची माहिती उघडकीस झाली आहे. देवळी पासून सात किमी अंतरावर असलेले टाकळी खोडे येथील रवीना रामदास पिंगळे वय १६ वर्ष ईला गेल्या चार महिन्या आधीपासून टाकळी खोडे येथील घरीच सर्पदंश झाला असता चार महिन्यापासून रवीना ही उपचार घेत असून आज मात्र प्राणजोत मावळली.
16 वर्षीय युवतीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेने टाकळी खोडे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.