अखेर विद्यार्थ्यांना न्यायासाठी बसावे लागले उपोषणाला

0

प्रातिनिधी / वर्धा :

रसुलबाद येथील जिल्हा परिषद शाळा आहे. त्याठिकाणी वर्ग 1 ते 8 मध्ये शिकणाऱ्या विद्याथ्यांची पटसंख्या 329 आहे . पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना 10 किमी पायदळ चालत जावे लागते कारण जाण्या येण्याचे कोणतेही साधन नाही बऱ्याच गावातच जर वर्ग 9 व वर्ग 10 त्याच शाळेमध्ये सुरू केला तर विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळेल तसेच विद्यार्थ्यांना होणार त्रास थांबेल याकरीता ग्राम पंच्यायत प्रशासन , शाळा शिक्षण समिति यांनी जिल्हा प्रशासनाला वारंवार निवेदने दिली. परंतु प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नाही. आज अखेर विद्यार्थी पालक ग्रामपंच्यायत प्रशासन यांनी जिल्हा परिषद समोर आंदोलन केले . या आंदोलनाला पाठिंबा देत आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे हेसुद्धा उपोषणाला बसलेत विशेष महणजे या आंदोलनाला वर्ग 8 च्या विद्यार्थ्यांचाही सहभाग होता. मागणी मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!