…अखेर सत्याचा विजय झाला रामजी शुक्ला महारोगी सेवा समिती दत्तपुर प्रकरण
प्रतिनिधी/ वर्धा:
डॉ. रामजी शुक्ला हे २०१४ पासुन महारोगी सेवा समिती, दत्तपुर येथे व्यवस्थापक आहे. मागील
सात वर्षापासून महारोगी सेवा समीती दत्तपुर या संस्थेचा कुठलाही आर्थीक लाभ न घेता सेवा करीत आहे.
या संस्थेत स्वयंघोषीत अध्यक्ष विभा गुप्ता यांनी अनेक ठीकाणी भ्रष्टाचार करून संस्थेला कमकुवत
करण्याचा प्रयत्न चालवला आहे. ३२ लाखाचा मुरुम १६ लाखाला विकुन रक्कम परस्पर स्वत:कडे घेतली,
येथील दालमील, ट्रॅक्टर व शेतीपूरक अवजारे यांची परस्पर विक्री करण्यात आली, अल्केश देसाई या गुजरात
मधील व्यापाराला शहराला लागुन असलेली २५ एकर जमीनीचा सौदा केला. या जमीनीच्या सौदयाला
डॉ रामजी शुक्ला यांनी आक्षेप घेतल्यामुळे त्यांचेवर अनेक आरोप करुन संस्थेबाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु
केला. सदर संस्थेवर विभा गुप्ता अध्यक्ष नसतांनाही अनेक विवादास्पद कृतीवर आक्षेप घेऊन डॉ.रामजी
शुक्ला सत्याच्या बाजुने उभे राहिले.
वर्धा चॅरीटी कार्यालयात अध्यक्षाचे नांव जोडून नागपूर क्षेत्रिय चॅरिटी कार्यालयात स्वयंघोषीत
अध्यक्ष विभा गुप्ता यांनी सभासदांसाठी अर्ज केला. संस्थेच्या घटना नियमानुसार महारोगी सेवा समिती,
दत्तपुर येथे कार्यकारी मंडळ अस्तीत्वात नसेल तेव्हा सर्व अधिकार व्यवस्थापकाकडे राहतात. याच
नियमाचा वापर करुन डॉ.रामजी शुक्ला यांनी सर्व सुत्रे हातात घेतली.
वर्धा जिल्हा दिवाणी न्यायालयानेही डॉ.रामजी शुक्ला यांचे कडून आदेश पारीत केला (आदेश
दिनांक 24/1/2022 नियमित दिवाणी बाद 258/2021) व मा.उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, यांनीही
डॉ.रामजी शुक्ला यांचे बाजुने आदेश पारीत केला. (याचिका क्रं. 1417/2022 आदेश दि.11/3/2022).
सर्व प्रकरणात विभा गुप्ता यांनी रुग्णालयातील रुग्णांना भडकवून आंदोलन उभे केले. परंतु
मा.श्री.प्रशांत होळकर पोलीस अधिक्षक यांनी सर्व रुग्णांची समजूत काढून आंदोलनास पूर्ण विराम दिला.
सदर लढाई सत्याची असून मा.गांधी द्वारा निर्मीत संस्थेला पूढे गालबोट लागु नये व सत्याच्या बाजूने
संस्थेची वाटचाल सुरू राहावी करीता कार्य करणे सुरु आहे.