अखेर समुद्रपूर येथे आढळलेला ‘तो ‘ बॉक्स निघाला रिकामा
साहसिक न्युज24
क्राइम प्रतिनिधी/ वर्धा:
नागपूर येथून चंद्रपूर येथील ऑडनस फॅक्टरी येथे आर्मीच्या गाडीतून बॉम्बचे ४०६ बॉक्स घेऊन जाताना समुद्रपूर तालुक्यातील नारायणपूर फाट्याजवळ एक रिकामा बॉक्स पडला. तो नागरिकांच्या निदर्शनात आल्यावर नागरिकांनी समुद्रपूर पोलिसांना त्याबाबत माहिती दिली. समुद्रपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी तातडीने घटनास्थळावर दाखल झाले. ती पेटी पाहून त्यांनी लगेच बॉम्ब पथक पाचारण केले. बॉम्ब पथक काही वेळात घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासणी केली असता तो बाक्स बॉम्ब चा असून तो रिकामा असल्याची दिसले. माहिती समुद्रपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी साहसिक न्युज24 च्या प्रतिनिधीला दिली. बॉम्ब चा रिकामा बॉक्स चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील ऑर्डर्स फॅक्टरी घेऊन जात होते.
परंतु ४०६ बॉम्बचे बॉक्स घेऊन निघालेल्या गाडीतून एक बॉम्ब चा रिकामा बॉक्स पडला जर त्या बॉक्समध्ये बॉम्ब असते आणि काही अपघात झाला असता तर जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.